एक्स्प्लोर
REVIEW | साहो : न साहो!
सुजीत दिग्दर्शित या सिनेमात प्रभास, श्रद्धा कपूर, नील नीतीन मुकेश, महेश मांजरेकर, मुरली शर्मा अशी बरीच स्टार कास्ट आहे. नुस्ती हाणामारी.. गोळ्या.. उडवलेल्या गाड्या.. पाडलेल्या बिल्डिंग्ज एवढंच दिसत राहतं. त्या ढिगाऱ्यातून आपण शोधू लागतो गोष्ट. म्हणजे, हे सगळं नेमकं कशासाठी चाललंय.. तेच कळेनासं होतं.
बाहुबली केल्यानंतर प्रभास आता पुन्हा एकदा सिनेमात प्रगटणार म्हटल्यावर कोण आनंद झाला होता. सिनेमासाठी चार-पाच वर्ष बाकी काही न करणारा कोणीही कलाकार पुढची कलाकृती स्वीकारतो तेव्हा आता काहीतरी भारी बघायला मिळणार गड्या असं वाटतं. आपलंही तेच झालं. 350 कोटी रुपये खर्चून के सुजीत या दिग्दर्शकाने हा सिनेमा बनवायला घेतला. पण खरं सांगतो, आता सिनेमा बघितल्यानंतर आपण नेमकं काय बघितलं याचा प्रश्न पडतो. खोटं वाटेल, पण त्या थ्री इडियटसमध्ये रणछोडदास आणि त्याचे शिक्षक यांच्यातला संवाद आहे ना? व्हॉट इज मशिन.. आठवला का? त्यात नंतर शिक्षक विचारतात अरे कहना क्या चाहते हो.. हाच डायलॉग सतत आठवत राहतो. आणि अर्थातच प्रभासला पाहिल्यावर पुन्हा पुन्हा बाहुबली आठवतो. त्यातला बाहुबली सैन्याला उद्देशून काही संवाद म्हणतो.. त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी तो मृत्यूवर एक भाषण देतो.. ते आठवतं. क्या है मृत्यू? तोच संवाद हा साहो सिनेमा झाल्यावर पुन्हा पुन्हा आठवायला लागतो. कारण, साहो पाहणं हा आपल्या पेशन्सचा मृत्यू आहे या मताशी आपण येऊन ठेपलेलो असतो.
सुजीत दिग्दर्शित या सिनेमात प्रभास, श्रद्धा कपूर, नील नीतीन मुकेश, महेश मांजरेकर, मुरली शर्मा अशी बरीच स्टार कास्ट आहे. नुस्ती हाणामारी.. गोळ्या.. उडवलेल्या गाड्या.. पाडलेल्या बिल्डिंग्ज एवढंच दिसत राहतं. त्या ढिगाऱ्यातून आपण शोधू लागतो गोष्ट. म्हणजे, हे सगळं नेमकं कशासाठी चाललंय.. तेच कळेनासं होतं. इतकंच कळलेलं असतं की दोन लाख कोटी रुपये चोरीला गेले आहेत. त्याच्या मागे अनेक माणसं आहेत. ती सगळी एकमेकांची कोणीतरी आहेत.. म्हणजे, परिचित आहेत... पण पैसा सगळीच नाती संपवून टाकतो तसं काहीसं होतं. आणि मग.. समोर येते ती अपरिमित वित्तहानी... मनुष्यहानी.. या सगळ्यात गोष्ट.. लॉजिक.. जरा तरी असावं की नाही? काही नाही.. उगाच सतत गोळीबार होतोय असं वाटून मग दिग्दर्शकाने थेट मध्ये गाणी घातलीत. अत्यंत तोकड्या कपड्यामध्ये असलेली नायिका आणि तितकाच उमदा नायक प्रभास.. ते गाणं.. आणि त्या गाण्यात घडणाऱ्या गोष्टीच फक्च लक्षात राहतात पण गाणं संपून पुन्हा सिनेमा सुरु झाला की ती गाणीही विसरतात. म्हणजे फार जांगडगुत्ता होतो राव सिनेमा बघताना.
ट्रेलर पाहिला असेल तर तुम्हाला गोष्ट लक्षात येईल. म्हणजे, साधारण कळेल. तेवढीच गोष्ट सिनेमा पूर्ण बघून झाल्यावर कळते. व्हीएफएक्स, चकाचक लोकेशन्स, कलादिग्दर्शन यात भरपूर खर्च केला आहे. सगळं काही कमाल उंची वापरण्यात आलं आहे. पण यातल्या नायकाच्या करामती पाहता हा नायक शक्तीमानचे कपडे विसरून आलाय की काय असं वाटतं. आता यात आलं सगळं. असो.
तर या सगळ्या प्रकरणानंतर पिक्चर बिक्चरमध्ये आपण या सिनेमाला देतोय दीड स्टार. फार घोळ आहेत राव. हा सिनेमा पाहायचा असेल तर थोडी कळ सोसा तो टीव्हीवर येईलच. त्यासाठी मुद्दाम थिएटरमध्ये जाऊन 2 तास 51 मिनिटं वाया घालवायची गरज नाही. असो. बाकी तुमची मर्जी.
REVIEW
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement