एक्स्प्लोर
जेनेलियाची 'लय भारी' न्यूज, 'माऊली' पुन्हा भेटीला
आदित्य सरपोतदार या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर जेनेलिया देशमुख सिनेमाची निर्मिती करणार आहे.
मुंबई : लय भारी सिनेमाच्या घवघवीत यशानंतर अभिनेता रितेश देशमुख माऊली या सिनेमातून पुन्हा भेटीला येत आहे. आदित्य सरपोतदार या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर जेनेलिया देशमुख सिनेमाची निर्मिती करणार आहे.
रितेशची पत्नी जेनेलियाने या सिनेमाची घोषणा केली आहे. तो येतोय असं म्हणत तिने सिनेमाच्या निर्मितीला सुरुवात झाली असल्याची माहिती दिली.
रितेश देशमुखचा लय भारी हा मराठी सिनेमा प्रचंड गाजला होता. त्यातली माऊली ही भूमिका एवढी लोकप्रिय झाली, की रितेश देशमुखला चाहते आजही माऊली नावाने हाक मारतात.
दरम्यान, हा सिनेमा कधी रिलीज होईल आणि यामध्ये आणखी कोण-कोण असेल, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पोस्टर पाहून चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.
Our most ambitious Marathi film goes on floor.
‘MAULI’ Starring @Riteishd Directed by @AdityaSarpotdar Written by @Kshitij_P Mumbai Film Company @mfc Wish us LUCK!!! @MeMauli तो येतोय..... pic.twitter.com/7VW4I6choC — Genelia Deshmukh (@geneliad) April 30, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement