Monica O My Darling Teaser : 'मोनिका ओ माय डार्लिंग'चा टीझर आऊट; राजकुमार राव प्रिंस ऑफ अंगोलाच्या भूमिकेत
Monica O My Darling : 'मोनिका ओ माय डार्लिंग' या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या सिनेमात सुपरस्टार राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे.
Monica O My Darling Teaser Released : बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा (Rajkummar Rao) आगामी सिनेमा नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'मोनिका ओ माय डार्लिंग' (Monica O My Darling) असे या सिनेमाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
'मोनिका ओ माय डार्लिंग' या सिनेमात अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे. नेटफ्लिक्सने सोमवारी 'मोनिका ओ माय डार्लिंग' या सिनेमाची घोषणा केली होती. त्यामुळे राजकुमारचे चाहते या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. टीझरमध्ये राजकुमार राव आणि आकांक्षा रंजन कपूर दिसून येत आहे. राजकुमार आकांक्षाला म्हणतोय,"मी मुळचा अंगोला या छोट्या खेड्यातला रहिवासी आहे".
View this post on Instagram
'मोनिका ओ माय डार्लिंग' या सिनेमात राजकुमार रावसह सिकंदर खेर, हुमा कुरैशी, राधिका आपटे आणि आकांक्षा रंजन कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. अद्याप निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केलेली नाही. राजकुमार राव या सिनेमात प्रिंस ऑफ अंगोलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
आता सिनेप्रेमींचा प्रत्येक दिवस होणार फिल्मी
कोरोनामुळे अनेक निर्माते त्यांचे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करत आहेत. अशातच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने नऊ सिनेमांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता सिनेप्रेमींचा प्रत्येक दिवस फिल्मी होणार आहे. यात 'मोनिका ओ माय डार्लिंग' या सिनेमासह द आर्चीज, प्लॅन ए प्लॅन बी, चोर निकल के भागा, खुफिया, कटहल, चकदा एक्सप्रेस, कला या सिनेमांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या