एक्स्प्लोर
दीपिका-रणवीरच्या लग्नात मोबाईल फोनवर बंदी?
याआधी सोनम कपूर-आनंद अहुजा आणि अनुष्का शर्मा-विराट कोहली यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ फार व्हायरल झाले होते.
मुंबई : अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यंदा इटलीमध्ये 20 नोव्हेंबर रोजी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण दीपवीरचं लग्न आणखी एका कारणामुळे चर्चेत आलं आहे. या दोघांच्या लग्नाच्या खासगी सोहळ्यात कोणीही मोबाईल फओन घेऊन येऊ शकत नाही, अशी अट या जोडप्याने ठेवली आहे.
याआधी सोनम कपूर-आनंद अहुजा आणि अनुष्का शर्मा-विराट कोहली यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ फार व्हायरल झाले होते. यावरुन धडा घेत रणवीर-दीपिकाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. या जोडप्याने लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना आवाहन केलं आहे की, त्यांनी या सोहळ्यात मोबाईल तसंच कॅमेरा आणू नये.
दीपिका-रणवीरचं विराट-अनुष्काच्या पावलावर पाऊल?
डेस्टिनेशन वेडिंग असल्याने लग्न सोहळ्यात निवडक लोकांनाच म्हणजे केवळ 30 पाहुण्यांना आमंत्रण दिलं जाणार आहे. इटली हे दोघांचं फेवरेट डेस्टिनेशन असल्यामुळे मिलानमधील लेक कोमोजवळ दोघं लगीनगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जातं. मात्र लग्नाबाबत दीपिका आणि रणवीरने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement