Raj Thackeray Birthday : 'इथून पुढील सर्वच वर्ष...'; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीनं शेअर केली खास पोस्ट
प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) देखील राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Raj Thackeray Birthday : आज मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा 55 वा वाढदिवस आहे. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे यांना वाढदिवाच्या शुभेच्छा देत आहेत. रात्री 12 वाजल्यापासूनच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. राज ठाकरेंनीदेखील निवासस्थानाबाहेर येऊन शुभेच्छा स्विकारल्या. आता मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) देखील राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
प्राजक्ता माळीची पोस्ट
प्राजक्ता माळीनं राज ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्राजक्ता ही राज ठाकरे यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. या फोटोला प्राजक्तानं कॅप्शन दिलं, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, मा. श्री. राजसाहेबांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...इथून पुढील सर्वच वर्ष, खासकरून हे वर्ष आपल्या आयूष्यातील सर्वोत्कृष्ट वर्ष ठरो…'
प्राजक्ताच्या या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता ही मनसे (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाच्या नव्या पक्षगीतावर डान्स करताना दिसली. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. या कार्यक्रमाचं ती सूत्रसंचालन करते. तसेच तिचा लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे.
प्राजक्ता माळीच्या 'प्राजक्तराज' या ज्वेलरी ब्रँडच्या उद्घाटन सोहळ्याला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील उपस्थित होत्या.
राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील चाहते राज्यभरातून त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले होते. या कार्यकर्त्यांच्या आणि चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राज ठाकरेंनी खास वेळ राखून ठेवली होती. त्यासाठी शिवतीर्थसमोर फुलांची सजावट करून कार्यकर्त्यांसाठी खास मंडप उभारण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या: