![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
OTT Release January 2023: जानेवारी महिन्यात मनोरंजनाचा धमाका; ओटीटीवर रिलीज होणार चित्रपट आणि वेब सीरिज
2023 च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये ऑनलाइन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी पाहा-
![OTT Release January 2023: जानेवारी महिन्यात मनोरंजनाचा धमाका; ओटीटीवर रिलीज होणार चित्रपट आणि वेब सीरिज mission majnu to vikram vedha and more films web series new year 2023 january OTT Release January 2023: जानेवारी महिन्यात मनोरंजनाचा धमाका; ओटीटीवर रिलीज होणार चित्रपट आणि वेब सीरिज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/3909a0c7e0713d64c9800df952b51e9e1672555187850259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
OTT Release January 2023: नवीन वर्षात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार आहेत. नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये ऑनलाइन OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी...
'ताजा खबर'
प्रसिद्ध YouTuber भुवन बामच्या 'ताजा खबर' या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये भुवन ब वसंत गावडेच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजच्या ट्रेलरने चाहत्यांची मनं जिंकली.
'विक्रम-वेधा'
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा 'विक्रम-वेधा' हा चित्रपट ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज आहे. 9 जानेवारीला हृतिक आणि सैफचा विक्रम-वेध ओटीटी प्लॅटफॉर्म Voot Select वर प्रदर्शित होणार , असं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
द पेले ब्लू आय (The Pele Blue Eye)
हॉलिवूड वेब सिरीज 'द पेल ब्लू आय' देखील जानेवारीमध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर 6 जानेवारीपासून स्ट्रिम केली जाणार आहे.
'मिशन मजनू'
बॉलिवूडचा सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्रा आणि साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदान्ना यांचा 'मिशन मजनू' हा चित्रपटही 20 जानेवारी रोजी थेट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
'ट्रायल बाय फायर'
'ट्रायल बाय फायर' ही रिलीजसाठी सज्ज झाली आहे. या सीरिजची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. एका सत्य घटनेवर आधारित ही वेब सिरीज 13 जानेवारी रोजी Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज होणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)