Miss Universe 2023: एक युनिक उत्तर अन् 23 वर्षाची शेनिस पॅलासिओस ठरली मिस युनिव्हर्स 2023! तो प्रश्न होता तरी काय?
Miss Universe 2023: 2023 मिस युनिव्हर्स स्पर्धा शनिवारी पार पडली. 23 वर्षाची शेनिस पॅलासिओस (Sheynnis Palacios) ही मिस युनिव्हर्स 2023 (Miss Universe 2023) या स्पर्धेची विजेती ठरली आहे.
Miss Universe 2023: निकाराग्वाची 23 वर्षाची शेनिस पॅलासिओस (Sheynnis Palacios) मिस युनिव्हर्स 2023 (Miss Universe 2023) या स्पर्धेची विजेती ठरली आहे. 2023 मिस युनिव्हर्स स्पर्धा शनिवारी पार पडली. या स्पर्धेच्या विजेतीची घोषणा झाल्यानंतर मिस युनिव्हर्स 2022 आर बॉनी गॅब्रिएलने तिचा क्राऊन शेनिस पॅलासिओसला दिला. आता जगभरातून शेनिस पॅलासिओसचं कौतुक होत आहे.
अंतिम फेरीमधील प्रश्न
मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेमधील अंतिम फेरीमध्ये स्पर्धेच्या फायनलिस्टला प्रश्न विचारण्यात आला की, "जर तुम्हाला दुसऱ्या महिलेच्या शूजमध्ये एक वर्ष जगण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का?".
शेनिसच्या उत्तरानं वेधलं लक्ष!
मिस निकाराग्वा शेनिस पॅलासिओसने अंतिम फेरीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे दिलेले उत्तर हे सर्वात वेगळे दिले. तिने उत्तर देताना मेरी वॉलस्टोनक्राफ्ट यांच्या नावाचा उल्लेख केला. मेरी या महिला हक्कासाठी लढलेल्या कार्यकर्त्या आणि स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जातात.
अंतिम फेरीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मिस ऑस्ट्रेलियाने तिला तिच्या आईच्या शूजमध्ये पाऊल ठेवायला आवडेल असे सांगून तिच्या आईचा सन्मान केला. तर मिस थायलंडने उत्तर देताना मलाला युसूफझाई यांचे नाव घेतले. तिने सांगितले की, त्यांचा संघर्ष आणि यश तिला खूप प्रेरणा देतो.
MISS UNIVERSE 2023 IS @Sheynnispalacios_of !!!! 👑 🇳🇮@mouawad #72ndMISSUNIVERSE #MissUniverse2023 pic.twitter.com/cSHgnTKNL2
— Miss Universe (@MissUniverse) November 19, 2023
MISS UNIVERSE 2023 IS @sheynnispalacio !!!! 🇳🇮👑@mouawad #72ndMISSUNIVERSE #MissUniverse2023 pic.twitter.com/mmR90DJ16m
— Miss Universe (@MissUniverse) November 19, 2023
मिस युनिव्हर्स स्पर्धेचे हे विजेतेपद पटकावणारी शेनिस पॅलासिओस ही निकाराग्वाची पहिली महिला ठरली आहे. शेनिसला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा क्राऊन परिधान करताच ती भावूक झाली आणि तिचे अश्रू अनावर झाले.
थायलंडची अँटोनिया पोर्सिल्ड ही मिस युनिव्हर्स 2023 या सौंदर्य स्पर्धेत पहिली उपविजेती ठरली, तर ऑस्ट्रेलियाच्या मोराया विल्सनला द्वितीय उपविजेतेपदाचा मुकुट देण्यात आला. 90 देशांमधील स्पर्धकांनी यंदा देखील मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभाग घेतला होता.
श्वेता शारदाने भारताचे प्रतिनिधित्व केले
यावर्षी चंदीगडमध्ये जन्मलेल्या श्वेता शारदाने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने टॉप 20 फायनलिस्टमध्ये आपले स्थान निश्चित केले. मात्र, तिला क्राऊन जिंकता आला नाही.
मिस युनिव्हर्सच्या यूट्यूब चॅनल आणि त्याच्या ट्विटर अकाउंटवरही मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धा ही ऑनलाइन प्रसारित करण्यात आली होती.
इतर महत्वाच्या बातम्या:
Miss Universe 2023 : कोण जिंकणार मिस युनिव्हर्सचा मुकुट? दिविता रायकडे भारताचे प्रतिनिधित्व