एक्स्प्लोर
बिग बींच्या नातीसोबत जावेद जाफरीच्या मुलाच्या अफेअरची चर्चा
'मलाल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला अभिनेता मीझान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा यांचं अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आल्यामुळे साहजिकच सर्वांच्या माना वळल्या. मात्र मीझानने या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं.
मुंबई : प्रसिद्ध विनोदी अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मीझानने 'मलाल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. मात्र पदार्पणापूर्वीच मीझानच्या कथित प्रेम प्रकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या. मीझानचं नाव जोडलं जात आहे ते थेट बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत.
मीझान आणि नव्या नवेली यांचं अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आल्यामुळे साहजिकच सर्वांच्या माना वळल्या. मात्र 'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत मीझानने या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगत नव्यासोबतच्या अफेअरच्या वृत्ताला इन्कार दिला.
'कदाचित, मी रिलेशनशीपमध्ये आहे. पण नव्यासोबत नाही. मी माझ्या मैत्रिणीचे फोटो काढले, याचा अर्थ ती माझी गर्लफ्रेण्ड आहे, असा होत नाही. जेव्हा माझ्या खऱ्याखुऱ्या गर्लफ्रेण्डसोबत माझे फोटो समोर येतील, तेव्हा कदाचित तुम्ही विश्वास ठेवाल' असं उत्तर मीझानने दिलं.
'जेव्हा तुम्हाला एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नीटशी माहिती नसते, तेव्हा तर्कवितर्क लढवणं, चर्चा करणं चुकीचं आहे. मीडियाने एक सीमारेषा आखायला हवी. माझ्याबद्दल काय बोललं जातं, याने मला फरक पडत नाही. पण नव्याबाबत हे अन्यायकारक ठरेल.' असंही मीझानला वाटतं.
मीझान आणि संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सेहगल 'मलाल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'टिंग्या' या पुरस्कारप्राप्त चित्रपटाचा दिग्दर्शक मंगेश हाडवळेकडेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आहे. मराठी मुलगा आणि उत्तर भारतीय मुलगी यांची 'लव्ह अँड हेट' स्टोरी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement