एक्स्प्लोर
'मसान'फेम श्वेता त्रिपाठी आणि चैतन्य शर्मा विवाहबंधनात
अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने पाच वर्षांनी लहान असलेला अभिनेता-रॅपर चैतन्य शर्मासोबत लगीनगाठ बांधली

मुंबई : 'मसान'फेम अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आणि अभिनेता-रॅपर चैतन्य शर्मा विवाहबंधनात अडकले. गोव्यामध्ये मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत दोघांनी काल लगीनगाठ बांधली. चैतन्य श्वेतापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. इन्स्टाग्रामवर श्वेता-चैतन्या यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. नववधूच्या वेशात श्वेता अत्यंत देखणी दिसत आहे. तर नवरदेव चैतन्यही लक्ष वेधून घेत आहे. श्वेता-चैतन्य यांनी बुधवारी प्री-व्हेडिंग पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला किरण राव, शिखा तलसानिया, श्रिया पिळगांवकर, रसिका दुग्गल, मल्लिका दुआ यासारखे सेलिब्रेटी उपस्थित होते. दिल्लीत एका नाटकाच्या निमित्ताने श्वेता आणि चैतन्य या दोघांची ओळख झाली होती. चैतन्यने अत्यंत रोमँटिक पद्धतीने श्वेताला लग्नाची मागणी घातली होती. आपलं नवीन नाटक येत असल्याचं सांगून त्याने श्वेताला मुंबईतील ककू क्लबमध्ये बोलावलं. मात्र त्यावेळी स्टेजवरच चैतन्यने श्वेताला प्रपोज केलं होतं. 'मसान'फेम श्वेता त्रिपाठी 5 वर्षांनी लहान अभिनेत्याशी लग्न करणार 32 वर्षांची श्वेता दिल्लीचे माजी मुख्य सचिव पीके त्रिपाठी यांची कन्या आहे. तिने मसान, हरामखोर यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. मसानमधील शालूची व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती. ती 'क्या मस्त है लाईफ' या मालिकेतही झळकली होती. श्वेताची 'मिर्झापूर' ही वेबसीरिज लवकरच रीलिज होणार आहे. रॅपर चैतन्य शर्मा 'स्लो चिता' या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचं हायजॅक चित्रपटातील 'क्रिपया ध्यान दे' हे गाणं गाजलं होतं. चैतन्यने अल्ट बालाजीवरील 'बॉयगिरी' या वेबसीरिजमध्ये भूमिका केली होती. झोया अख्तरच्या 'गल्ली बॉय' सिनेमात तो रणवीर सिंग आणि आलिया भटसोबत झळकणार आहे.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















