Marathi Serial : ठरलं तर मग! जुई गडकरीने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी; पहिल्याच आठवड्यात 5.7 रेटिंग
Marathi Serial Trp Rating : मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते.
![Marathi Serial : ठरलं तर मग! जुई गडकरीने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी; पहिल्याच आठवड्यात 5.7 रेटिंग Marathi Serial Tharla Tar Mag Jui Gadkari wins TRP race 5.7 rating in its first week Marathi Serial : ठरलं तर मग! जुई गडकरीने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी; पहिल्याच आठवड्यात 5.7 रेटिंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/16/eeaae5ad8979e2bdac9c4cbc180297581671161548332254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...
1. टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे.
2. 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.
3. टीआरपी लिस्टमध्ये 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.
4. 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.
5. 'ठरलं तर मग' हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे.
6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.2 रेटिंग मिळाले आहे.
7. टीआरपीच्या शर्यतीत 'आता होऊ दे धिंगाणा' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.2 रेटिंग मिळाले आहे.
8. 'स्वाभिमान' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.9 रेटिंग मिळाले आहे.
9. नव्या स्थानावर 'अबोली' ही मालिका आहे. या मालिकेला 4.2 रेटिंग मिळाले आहे.
10. 'लग्नाची बेडी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.9 रेटिंग मिळाले आहे.
'बिग बॉस मराठी' टीआरपीच्या शर्यतीत मागेच
'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व सुरू होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 'बिग बॉस'ची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम असते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच चाहते हा कार्यक्रम फॉलो करत असतात. पण यंदा मात्र हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत मागे पडला आहे. या कार्यक्रमाला 2.5 रेटिंग मिळाले आहे. तर वीकेंडच्या चावडीला 3.0 रेटिंग मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)