(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathi Drama : अन् मराठी नाट्यसृष्टी बहरली! ऑगस्टमध्ये नाट्यरसिकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
Marathi Natak : ऑगस्टमध्ये वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी मराठी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Upcoming Marathi Drama : मराठी मनोरंजनसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत. एकीकडे वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे मराठी सिनेमे (Marathi Movies) प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. बॉक्स ऑफिसवर (Box Office) हे सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान नवीकोरी नाटकंदेखील (Upcoming Marathi Drama) प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. 'जर तरची गोष्ट', 'ब्रँड अॅम्बॅसेडर', 'किरकोळ नवरे', 'चाणक्य', 'मी नथुराम गोडसे बोलतोय' ही नवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.
जर तरची गोष्ट (Jar Tar Chi Goshta) :
अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामतचं 'जर तरची गोष्ट' हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या नाटकाच्या माध्यमातून प्रिया-उमेश 10 वर्षांनी रंगभूमीवर एकत्र काम करणार आहेत. प्रिया उमेशसह या नाटकात आशुतोष गोखले आणि पल्लवी अजयदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. इरावणी इरावती कर्णिक यांनी लिहिलेल्या या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी सांभाळली आहे. येत्या 5 ऑगस्टला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.
View this post on Instagram
किरकोळ नवरे :
पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य करणारं 'किरकोळ नवरे' हे नाटक ऑगस्टमध्ये नाट्यरसिकांच्या भेटीला येणार आहे. हे नाटक विनोदी असून असुरक्षितता आणि प्रेमाबद्दल भाष्य करणारं आहे. 'किरकोळ नवरे' या नाटकात सागर देशमुख, पुष्कराज चिरपुटकर, अनिता दाते महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 11 ऑगस्टला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडणार आहे.
चाणक्य :
'चाणक्य' हे हिंदी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोज जोशी मुख्य भूमिकेत असलेल्या या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रणव जोशीने सांभाळली आहे. हिंदी नाटकाच्या मराठी रुपांतरणाचं काम शैलेश दातारने केलं आहे.
मी नथुराम गोडसे बोलतोय :
'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. प्रदीप दळवी लिखित या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा विनय आपटे यांनी सांभाळली आहे. नाटकाचं पुनर्दिग्दर्शन विवेक आपटे करणार आहेत. नाटकातील नथुरामच्या मुख्य भूमिकेसाठी कलाकाराचा शोध सुरू आहे.
संबंधित बातम्या