Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Nagraj Manjule Naal 2 : 'आई मला खेळायला जायचंय' नंतर प्रेक्षक रमणार 'डराव डराव'मध्ये; नागराज मंजुळेंच्या 'नाळ 2'मधील नवं गाणं आऊट!


Nagraj Manjule Naal 2 Song Out : नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) 'नाळ 2' (Naal 2) या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल. या सिनेमातील 'भिंगोरी' (Bhingori) हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. आता या सिनेमातील 'डराव डराव' (Darav Darav) हे दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Jhimma 2: "पुन्हा खेळूया नवा खेळ, सोबत नव्या नात्यांचा मेळ"; झिम्मा-2 चा जबरदस्त टीझर रिलीज


Jhimma 2 Teaser: 'झिम्मा' (Jhimma) या चित्रपटाच्या यशानंतर झिम्मा-2 (Jhimma 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. या टीझरमध्ये केवळ अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) दिसला पण, आता झिम्मा-2 या चित्रपटाचा आणखी एक टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये झिम्मा-2 या चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट दिसत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kiran Mane : "व्यवस्थेला धाक दाखवण्याचं काम तुम्ही करताय"; मनोज जरांगेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट


Kiran Mane On Manoj Jarange : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विविध विषयांवर व्यक्त होत असतात. मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी मनोज जरांगे उपोषण करत आहे. आता मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल किरण माने यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधव व्यसनापासून दूर; 'या' कारणाने दारू, सिगारेटला हात लावत नाही


Siddharth Jadhav : अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीही त्याने गाजवली आहे. सिद्धार्थ जाधव आज मराठीतला सुपरस्टार असला तरी व्यसनापासून मात्र तो दूरच आहे. सिद्धार्थने आजवर दारू आणि सिगारेटला हात लावलेला नाही. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Manoj Jarange : "मनोज जरांगेंना काही झालं तर सरकारने तयारी ठेवावी"; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत


Ashwini Mahangade On Manoj Jarange Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. मनोज जरांगे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळतो आहे. आता मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारही याबद्दल आपली प्रतिक्रिया देत आहेत. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत असल्याने 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) फेम अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) एक पोस्ट शेअर केली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा