Jhimma 2 Teaser: 'झिम्मा' (Jhimma) या चित्रपटाच्या यशानंतर झिम्मा-2 (Jhimma 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. या टीझरमध्ये केवळ अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) दिसला पण, आता झिम्मा-2 या चित्रपटाचा आणखी एक टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये झिम्मा-2 या चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट दिसत आहे.


झिम्मा-2 या चित्रपटाच्या नव्या टीझरमध्ये दिसते की, यंदा इंदूच्या  75 व्या वाढदिवसानिमित्त सर्व मैत्रिणी ट्रीपला जाणार आहेत. टीझरमध्ये वैशालीची भाची मनाली आणि  निर्मलाची सून या देखील दिसत आहेत. झिम्मा-2 चित्रपटाचा हा टीझर पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जाऊ शकतो की, हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. "पुन्हा खेळूया नवा खेळ, सोबत नव्या नात्यांचा मेळ" ही टॅग लाईन देखील झिम्मा-2 या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसत आहे.


पाहा टीझर:






झिम्मा या चित्रपटात  सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सयाली संजीव, मृण्मयी गोडबोले  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती.   पण आता झिम्मा-2 चित्रपटाच्या टीझरमध्ये सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले या दोघी दिसत नाहीत. पण झिम्मा-2 चित्रपटात रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे या दोघी महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत.


'झिम्मा-2' चित्रपटाचा टीझर देखील काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या टीझरच्या सुरुवातीला दिसते, सिद्धार्थ म्हणतो, "देवा, लक्षात ठेव हा!" त्यानंतर तो मोबाईलमध्ये मेसेज टाईप करायला सुरुवात करतो. 'बायांनो पुढच्या ट्रीपची तयारी करायला घ्या कारण आहे, इंदू डार्लिंगचा 75 वा वाढदिवस, जो तिला आपल्यासोबत सेलिब्रेट करायचा आहे आणि तिच्याकडे एक सरप्राईज आहे. चला!', असा मेसेज सिद्धार्थ टाईप करतो.






'झिम्मा-2' चित्रपटाचा टीझर शेअर करुन  सिद्धार्थ चांदेकरनं कॅप्शनमध्ये लिहिलं,  "आता खेळ सुरू… इंदू डार्लिंग च्या 75 व्या वाढदिवसासाठी कोण कोण येणार? लवकरच कळणार…'झिम्मा-2' 24 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात"


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Jhimma 2: 'आम्ही या चित्रपटाची वाट बघत आहोत पण रिंकू राजगुरु..."; झिम्मा-2 चित्रपटाबाबत नेटकऱ्यानं केली कमेंट; सिद्धार्थ रिप्लाय देत म्हणाला...