Siddharth Jadhav : अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीही त्याने गाजवली आहे. सिद्धार्थ जाधव आज मराठीतला सुपरस्टार असला तरी व्यसनापासून मात्र तो दूरच आहे. सिद्धार्थने आजवर दारू आणि सिगारेटला हात लावलेला नाही. 


'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ जाधव म्हणाला,"मराठी मनोरंजनसृष्टीतील सुनील बर्वे, दिलीप काका असे अनेक दिग्गज कलाकार व्यसनापासून दूर आहेत. व्यसन केलं पाहिजे असं काही नसतं. माझ्या आईला मी वचन दिलं आहे की, मी कधीही दारू आणि सिगारेटला हात लावणार नाही आणि आत्महत्याही करणार नाही".


सिद्धार्थ पुढे म्हणाला,"आई- बाबा दोघेही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि हे वचन मी माझ्या आईला दिलेलं असल्याने मी कधीच या गोष्टी करणार नाही. या गोष्टींपासून मी दूर आहेच. पण एक भावनिक कनेक्ट म्हणून मी माझ्या आईला हे वचन दिलं आहे". सिद्धार्थ जाधवचं त्याच्या कुटुंबियांसोबत खूप घट्ट नातं आहे. आईला दिलेल्या शब्दाखातर सिद्धार्थ आजही व्यसनापासून दूर आहे.


सिद्धार्थ जाधवबद्दल जाणून घ्या... (Siddharth Jadhav Movies)


कॉलेजमध्ये असताना एकांकिकेंच्या माध्यमातून अभिनयप्रवासाची सुरुवात करणाऱ्या सिद्धार्थने अगं बाई अरेच्चा. जत्रा, साडे माडे तीन, दे धक्का, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 


'जागो मोहन प्यारे', 'तुमचा मुलगा करतोय काय', 'लोच्या झाला रे' आणि 'गेला उडत' या नाटकांच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. सिद्धार्थचा 'अफलातून' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तीन डिटेक्टिव्ह मित्रांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळाली. आता छोट्या पडद्यावरील 'आता होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिद्धार्थ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपला सिद्धू म्हणून तो चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.


सिद्धार्थचा सिनेप्रवास


अगं  बाई  अर्रेचा!, जत्रा, बकुळा नामदेव घोटाळे, साडे माडे तीन, दे धक्का, बाप रे बाप डोक्याला ताप, गलगडे निघाले, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, हुप्पा हु्य्या, शिक्षणाच्या आयचा घो, लालबाग परळ, कुटुंब, टाईम प्लीज अशा अनेक लोकप्रिय सिनेमांच्या माध्यमातून सिद्धार्थ जाधव रुपेरी पडद्यावर झळकला आहे. सिद्धार्थने मराठी चित्रपटांत निरनिराळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.


संबंधित बातम्या


Aata Hou De Dhingana: भन्नाट टास्क आणि कलाकारांची मजा मस्ती; ‘आता होऊ दे धिंगाणा’चं दुसरं पर्व येणार प्रेक्षकांच्या भेटीस