Ashwini Mahangade On Manoj Jarange Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. मनोज जरांगे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळतो आहे. आता मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारही याबद्दल आपली प्रतिक्रिया देत आहेत. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत असल्याने 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) फेम अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) एक पोस्ट शेअर केली आहे.

Continues below advertisement

अभिनेत्री अश्विनी महांगडेने मनोज जरांगे यांचा फोटो असलेली एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर मनोज जरांचे यांचा एक कोट लिहिलेला आहे की,"मला बोलता येतंय तोवर फक्त एकदा चर्चेचा या. पुन्हा चर्चा होणार नाही". एकच मिशन मराठा आरक्षण". 

अश्विनीने मनोज जरांगेंची पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"एक मराठा लाख मराठा...आणि पाटील साहेबांना काही झाले तर सरकारने त्याचीही तयारी ठेवा मग. आता आमच्यावर नुसते लाठीचार्ज करून उपयोग होणार नाही". अश्विनीची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

Continues below advertisement

राज्यभरात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आहेत. मराठी आरक्षणासाठी जरांगे दुसऱ्यांदा उपोषण करत आहेत. जोवर सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आता मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण यासंदर्भात मराठी मनोरंजनसृष्टीतून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. अश्विनी महांगडेआधी अभिनेते किरण मानेंनीदेखील मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाबद्दल पोस्ट शेअर केली होती. किरण माने साताऱ्यातील आंदोलनात सहभागी झाले होते. साताऱ्यातील आंदोलनकर्त्यांबरोबरचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस

मनोज जरांगे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. या सहा दिवसांत त्यांनी अन्नाचा कण देखील घेतला नाही. तसेच, दोन-तीन वेळा विशेष विंनतीवरून पाण्याचा घोट घेतला आहे. त्यामुळे आता त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. तर, जरांगे यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. तर, या सर्व पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी गावात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या बांधवांची गर्दी पाहायला मिळत आहे. 

संबंधित बातम्या

Kiran Mane : "व्यवस्थेला धाक दाखवण्याचं काम तुम्ही करताय"; मनोज जरांगेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट