OTT Release This Week : ओटीटीची (OTT) क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ओटीटीवर सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सिनेमागृहात फ्लॉफ किंवा सुपरहिट झालेले सिनेमे रिलीजच्या एक-दोन महिन्यांनंतर ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. ओटीटीवर प्रेक्षकांची वाढती संथ्या लक्षात घेता अनेक निर्माते त्यांचे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करत आहेत. 'या' आठवड्यातही (OTT Release This Week) अनेक बिग बजेट सिनेमे ओटीटीवर रिलीज होणार असून ते घरबसल्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 


जवान (Jawan)
कधी होणार रिलीज? 2 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा 2 नोव्हेंबर 2023 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने जगभरात चांगलीच कमाई केली. आता हा सिनेमा ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


आर्या 3 (Arya 3)
कधी होणार रिलीज? 3 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार


अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) 'आर्या' या वेबसीरिजला प्रेक्षकांचं चांगलच प्रेम मिळालं आहे. 2020 मध्ये ही सीरिज रिलीज झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये या सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची अर्थात 'आर्या 3'ची (Arya 3) प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 3 नोव्हेंबर 2023 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही सीरिज रिलीज होणार आहे.


ताकेशी कैसल (Takeshi Castle)
कधी होणार रिलीज? 2 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ


'ताकेशी कैसल' हा जपानचा फेमस गेम शो आहे. 'ताकेशी कैसल' हा कार्यक्रम 34 वर्षांनी हिंदीत पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. यआधी जावेद जाफरी (Javed Jaffrey) यांनी हा शो डब केला होता. त्यानंतर लोकप्रिय युट्यूबर भुवन बामने (Bhuvan Bam) हिंदीत हा कार्यक्रम डब केला. 'ताकेशी कैसल' हा कार्यक्रम 2 नोव्हेंबरपासून अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


पीआय मीना (PI Meena)
कधी होणार रिलीज? 3 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ


'पीआय मीना' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा देबोलॉय भट्टाचार्य यांनी सांभाळली आहे. या सिनेमा पीआय मीनाच्या भूमिकेत तान्या मानिकतला दिसणार आहे. ही क्राइम, थ्रीलर सीरिज आहे. 'पीआय मीना' हा सिनेमा 3 नोव्हेंबरला अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.


स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी वॉल्यूम 2 (Scam 2003 : The Telgi Story Voloume 2)
कधी होणार रिलीज? 3 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ


'स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी वॉल्यूम 2' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी सांभाळली आहे. ही सीरिज सोनी लिव्हवर 3 नोव्हेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.


संबंधित बातम्या


November OTT Web Series : नोव्हेंबर महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; 'या' वेबसीरिज होणार रिलीज