Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल'ला 'ती' चूक पडली महागात; अंकिता वालावलकर नेटकऱ्यांकडून ट्रोल


Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. तिचं एक रील सध्या सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आहे. तिच्या या 'वास्तव' रीलने नेटकरी मात्र दुखावले गेले आहेत. प्रचंड कौतुक करणाऱ्या अंकितावर आता नेटकऱ्यांनीच टीका केली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tharala Tar Mag : छोट्या पडद्यावर जुई गडकरीचं राज्य! टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' पहिल्या क्रमांकावर


Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेने नेहमीप्रमाणे या आठवड्यातही टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kiran Mane : "जरांगे पाटलांच्या धैर्याला अन् चिकाटीला सलाम"; किरण मानेंची मराठा आरक्षणाबद्दल खास पोस्ट


Kiran Mane On Manoj Jarange Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा देशभरात चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाज उपोषण करत आहे. साताऱ्यातील साखळी उपोषणात अभिनेते किरण मानेदेखील (Kiran Mane) सहभागी झाले होते. साताऱ्यातील आंदोलनकर्त्यांबरोबरचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tuja Maja Sapan : पैलवान प्राजक्ता पुन्हा उतरणार कुस्तीच्या आखाड्यात; 'तुजं माजं सपान' मालिकेचा रंगणार विशेष भाग


Tuja Maja Sapan Marathi Serial Latest Update : 'तुजं माजं सपान' (Tuja Maja Sapan) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता मालिकेच्या आगामी भागात पैलवान प्राजक्ता पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरलेली पाहायला मिळेल. या मालिकेचा महाएपिसोड रंगणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप? समोर आलं मोठं कारण


Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa yeu Dya) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हा कार्यक्रम महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे. पण आता हा बहुचर्चित कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.  


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा