Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Subhedar : 'सुभेदार' सिनेमा महाराष्ट्रातल्या शाळकरी विद्यार्थांना सवलतीच्या दरात पाहता येणार; विशेष ऑफर काय? जाणून घ्या...


Subhedar Movie Team Announce Special Discount For Maharashtra School Children : 'सुभेदार' (Subhedar) या मराठी सिनेमाचा राज्यातील सर्व सिनेमागृहात बोलबाला पाहायला मिळत आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित हा सिनेमा पाहायला प्रेक्षक सहकुटुंब जात आहेत. आता हा सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहावा म्हणून या सिनेमाच्या टीमने विशेष ऑफर ठेवली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kalavantancha Ganesh : "बाप्पा कायम माझ्या पाठीशी"; 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम कार्तिकी गायकवाडला आवडतं गणेशोत्सवात गाण्यांचे कार्यक्रम सादर करायला


Kartiki Gaikwad On Kalavantancha Ganesh : विघ्नहर्ता गणपती बाप्पावर (Ganapati Bappa) अनेकांची नितांत श्रद्धा असते. गणेशोत्सवाचं स्वत:चं वेगळं महत्तव आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आहे. गणपती बाप्पा हा प्रत्येकासाठीच खास असतो. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींसाठीदेखील खास असतो. 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम (Sa Re Ga Ma Pa Little Champs) कार्तिकी गायकवाडसाठीदेखील (Kartiki Gaikwad) बाप्पा खूप खास आहे. गणेशोत्सवात गाण्यांचे कार्यक्रम सादर करताना तिला खूप आनंद मिळतो.  


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Namrata Sambherao : नम्रता संभेरावचा वाढदिवस; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनी खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा


Namrata Sambherao: अभिनेत्री  नम्रता संभेराव (Namrata Sambherao) ही तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तिनं साकारलेल्या लॉली भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  नम्रता ही  महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येते.  नम्रता आज वाढदिवस आहे.  नम्रताच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधील कलाकारांनी खास पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Jar Tarchi Goshta : प्रिया बापट-उमेश कामतच्या 'जर तर ची गोष्ट' नाटकाने रंगभूमी बहरली; आतापर्यंतचे सगळे प्रयोग 'हाऊसफुल्ल'


Jar Tarchi Goshta : अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांचं 'जर तर ची गोष्ट' (Jar Tarchi Goshta) हे नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहे. एकीकडे मराठी नाटकांना प्रेक्षक नाही असं म्हटलं जात असताना नाटकाचा प्रेक्षक कुठेही गेलेला नाही, हे 'जर तर ची गोष्ट' (Jar Tarchi Goshta) या नाटकाने दाखवून दिलं आहे. नुकत्याच रंगभूमीवर आलेल्या या नाटकाचे आतापर्यंतचे सर्व प्रयोग हाऊसफुल्ल झाले आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Rama Raghav : 'रमा राघव' मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग! बहिणीने बहिणीला राखी बांधून दिले वचन...


Rama Raghav Serial Raksha Bandhan Special Episode : 'रमा राघव' (Rama Raghav) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. आता 'रमा राघव' या मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग रंगणार आहे. बहिणीने बहिणीला राखी बांधून वचन दिल्याने हा भाग नक्कीच खास असणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा