Subhedar Movie Team Announce Special Discount For Maharashtra School Children : 'सुभेदार' (Subhedar) या मराठी सिनेमाचा राज्यातील सर्व सिनेमागृहात बोलबाला पाहायला मिळत आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित हा सिनेमा पाहायला प्रेक्षक सहकुटुंब जात आहेत. आता हा सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहावा म्हणून या सिनेमाच्या टीमने विशेष ऑफर ठेवली आहे. 


'सुभेदार'ची विशेष ऑफर काय आहे? 


महाराष्ट्रातल्या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी 'सुभेदार'च्या टीमने एक विशेष ऑफर ठेवली आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्समध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. फक्त 140 रुपयांत प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. पण या विशेष ऑफरसाठी खास अटीदेखील आहेत. 


विशेष ऑफरच्या अटी काय आहेत? 


- शोची वेळ सकाळी 11 च्या आधी असणे आवश्यक आहे.
- आठवड्याच्या दर सोमवार ते गुरुवार फक्त दिवसांसाठी वैध.
- कन्फर्मेशन आणि पेमेंट 48 तासांपूर्वी आले पाहिजे.
- सकाळी 11 च्या आधी ज्या वेळेस त्यांना ज्या वेळेस त्यांना पीव्हीआर आणि आयनॉक्स स्क्रीनची आवश्यकता असेल, ती वेळ देण्यात येईल.
- प्रत्येक शोसाठी किमान तिकीट बुकिंग 100 तिकीटे असावी.






'सुभेदार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Subhedar Box Office Collection)


'सुभेदार' या ऐतिहासिक सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 25 ऑगस्ट 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 1.15 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 1.69 कोटी, तिसऱ्या दिवशी 2.22 कोटी, चौथ्या दिवशी 0.72 कोटी आणि पाचव्या दिवशी 1.05 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या पाच दिवसांत या सिनेमाने 6.83 कोटींचा गल्ला जमवला आहे.


'सुभेदार' सिनेमातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. 'आले मराठे' या गाण्यावर सिनेमागृहांमध्येच रसिक बेधुंद होऊन भगवे झेंडे घेऊन नाचत आहेत.'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष करत प्रेक्षकांचे लहान-मोठे गट एकत्रितपणे सिनेमा पहायला गर्दी करत आहेत.‘सुभेदार’ सिनेमाने बॉक्स ऑफिसचा गड दणक्यात सर केला आहे.  


शिवराज अष्टकातील 'सुभेदार' रूपी पाचवे चित्रपुष्प 25 ऑगस्टला रसिक दरबारी सादर केले आणि 350 सिनेमागृहांतील 1000 हून अधिक शोजमधून प्रेक्षकांनीही विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही 'सुभेदार' चित्रपटाची जोरदार घोडदौड सुरू आहे.


संबंधित बातम्या 


Subhedar Review : 'सुभेदार' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...