Jawan New Song Out: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh khan) जवान (Jawan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा प्री व्ह्यू काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. तसेच या चित्रपटामधील जिंदा बंदा आणि चलेया ही गाणी देखील प्रेक्षकांच्या भेटीस आली. आता या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. जवान चित्रपटाच्या ट्रेलर आधी या चित्रपटामधील 'नॉट रमैया वस्तावैया'  हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात शाहरुख खान आणि अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) यांचा जबरदस्त डान्स बघायला मिळत आहे.


अनिरुद्ध रविचंदर, विशाल ददलानी आणि शिल्पा राव यांनी 'नॉट रमैया वस्तावैया'  हे गाणं गायलं आहे. तर अनिरुद्ध रविचंदर यांनी  हे गाणं संगीतबद्ध केले.कुमार हे या गाण्याचे गीतकार आहेत. 'नॉट रमैया वस्तावैया'  या गाण्यात शाहरुख आणि नयनतारा यांचा रोमँटिक अंदाज देखील दिसत आहे.


पाहा गाणं



काही दिवसांपूर्वी जवान या चित्रपटामधील जिंदा बंदा हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. 'जिंदा बंदा' या गाण्यात शाहरुखसोबतच सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य या अभिनेत्री देखील थिरकताना दिसले. तर जवान चित्रपटामधील 'चलेया'  या गाण्यात  शाहरुख आणि नयनतारा  यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली. जिंदा बंदा आणि चलेया या दोन्ही गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती मिळाली.


ट्रेलर 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस


'जवान' या चित्रपटाचा ट्रेलर 31 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज करण्यात येणार आहे. 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 


जवान कधी होणार रिलीज?


जवान   हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट  हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे. काही दिवसांपूर्वी  सेन्सॉर बोर्डानं जवान या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले आहे. जवान  या चित्रपटात शाहरुख आणि नयनतारासोबतच विजय सेतुपती, सुनील ग्रोवर प्रियमणी, सान्या मल्होत्रा,प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  आता शाहरुखचा जवान हा चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच त्याचा डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


संबंधित बातम्या


Jawan Trailer : शाहरुखच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला! बुर्ज खलिफावर होणार'जवान'च्या ट्रेलरचं स्क्रीनिंग