Jar Tarchi Goshta : अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांचं 'जर तर ची गोष्ट' (Jar Tarchi Goshta) हे नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहे. एकीकडे मराठी नाटकांना प्रेक्षक नाही असं म्हटलं जात असताना नाटकाचा प्रेक्षक कुठेही गेलेला नाही, हे 'जर तर ची गोष्ट' (Jar Tarchi Goshta) या नाटकाने दाखवून दिलं आहे. नुकत्याच रंगभूमीवर आलेल्या या नाटकाचे आतापर्यंतचे सर्व प्रयोग हाऊसफुल्ल झाले आहेत. 


अद्वैत दादरकर (Adwait Dadarkar) आणि रणजित पाटील (Ranjit Patil) दिग्दर्शित 'जर तर ची गोष्ट' हे नाटक आहे. तर इरावती कर्णिकने (Irawati Karnik) या नाटकाचं लेखन केलं आहे. 'जर तर ची गोष्ट' हे नाटक 5 ऑगस्ट 2023 रोजी रंगभूमीवर आलं आहे. 5 ऑगस्टपासून नाट्यरसिकांच्या भेटीला आलेल्या या नाटकाने आतापर्यंत सुमारे 15 प्रयोग केले असून हे सर्व प्रयोग हाऊसफुल्ल गेले आहेत. यावरूनच हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याची पोचपावती आहे.


'जर तर ची गोष्ट' या नाटकाने सध्या सर्व नाट्यगृहांबाहेर 'हाऊसफुल्ल'चा बोर्ड झळकळवला आहे. 'जर तर ची गोष्ट' या नाटकात प्रिया बापट (Priya Bapat), उमेश कामत (Umesh Kamat), पल्लवी अजय (Pallavi Ajay) आणि आशुतोष गोखले (Ashutosh Gokhale) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


प्रिया बापट आणि उमेश कामत दहा वर्षांनी रंगभूमीवर एकत्र काम करत असल्याने त्यांच्या चाहत्यांना त्यांना पाहण्याची विशेष उत्सुकता आहे. या नाटकावर सर्व वयोगटातील प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कुठेतरी प्रत्येकाच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारे हे नाटक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. 


'जर तर ची गोष्ट' हे नाटक आजच्या तरुणांचं : उमेश कामत


'जर तर ची गोष्ट' या नाटकाबद्दल एबीपी माझाशी बोलताना उमेश कामत म्हणाला,"जर तर ची गोष्ट' हे नाटक आजच्या तरुणांचं आहे. त्यांचे विचार, रिलेशनशिपकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन अशा अनेक गोष्टींवर भाष्य करणारं आजच्या तरुणांना रिप्रेझेंट करणारं हे नाटक आहे". 


प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल प्रिया बापट आणि उमेश कामत म्हणतात,"प्रेक्षकांना आम्हाला रंगमंचावर एकत्र पाहण्याची इच्छा होती आणि दहा वर्षांनंतर ती पूर्ण झाली. 'जर तर ची गोष्ट'ला नाट्यरसिकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. नाटक संपल्यावर प्रेक्षक आम्हाला आवर्जून भेटायला येत आहेत. नाटकाचं, आमचं कौतुक करतात. अनेकांना हे नाटक पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. नाटकाबद्दलच्या या सकारात्मक प्रतिक्रिया मनाला उभारी देणाऱ्या आहेत. तुमच्या सर्वांचे हे प्रेम पाहून आम्हाला अधिक उत्तम काम करण्याची ऊर्जा मिळते. कलाकाराला याहून जास्त काय हवं".


संबंधित बातम्या


Jar Tarchi Goshta : प्रिया बापट-उमेश कामतच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ; पहिल्याच प्रयोगाला झळकली ‘हाऊसफुल्ल’ची पाटी