Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Vanita Kharat : न्यूड फोटोशूट ते 'कबीर सिंह'मधील मोलकरीण; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचं फिल्मी करिअर


Vanita Kharat : अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कॉलेजमध्ये असताना रंगभूमीवर ठेवलेलं पहिलं पाऊल ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) पर्यंतचा वनिताचा प्रवास खूपच फिल्मी आहे. न्यूड फोटोशूट (Nude Photoshoot) ते 'कबीर सिंह' (Kabir Singh) सिनेमातील मोलकरीण पुष्पा अशा अनेक कारणांनी वनिता (Marathi Actress) चर्चेत आली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमात 'हे' कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत; दमदार कलाकारांची फौज असलेला 'पंचक'


Madhuri Dixit Marathi Movie Panchak : धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) आजही मोठा चाहतावर्ग आहे. सौंदर्य  आणि अभिनयाच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'बकेटलिस्ट' या सिनेमानंतर माधुरी पुन्हा एकदा मराठी मनोरंजनसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज आहे. माधुरीने तिच्या 'पंचक' (Panchak) या सिनेमाची घोषणा केल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tharala Tar Mag : सायली सगळ्यांना सांगणार ती प्रेग्नंट नसल्याचं सत्य, 'ठरलं तर मग' मालिकेचा रंगणार विशेष भाग; प्रोमो आऊट


Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील नवनवे ट्विस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. गेल्या काही दिवसांपासून सायली खोटी प्रेग्नंट असल्याचा ट्रॅक मालिकेत सुरू आहे. पण आता मालिकेच्या आगामी भागात सायली स्वत: ती प्रेग्नंट नसल्याचं सत्य सर्वांना सांगणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Ekda Yeun Tar Bagha : तेजस्विनी पंडित, वनिता खरात अन् ओंकार भोजने; तगडी स्टारकास्ट असलेला 'एकदा येऊन तर बघा' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज


Ekda Yeun Tar Bagha : 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना विनोदाचा तडका पाहायला मिळणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


'बॉलीवूड मिस्टर अँड मिसेस इंडिया' स्पर्धेत बेळगावच्या महिलेने पटकावले विजेतेपद; पाहा फोटो


दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या बॉलीवूड मिस्टर अँड मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये   बेळगावच्या महिलेने विजेतेपद पटकाविले आहे. ज्योती कत्ती असे त्यांचे नाव असून मिसेस बॉलीवूडचा किताब  त्यांनी प्राप्त केला आहे. त्यामुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला  गेला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा