Elvish Yadav : 'बिग बॉस ओटीटी 2' विजेता (Bigg Boss OTT) एल्विश यादव (Elvish yadav) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडातील रेव्ह पार्टीवरील छाप्यादरम्यान एल्विश यादवसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांनी आत्तापर्यंत तीन राज्यांत छापेमारी केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर माझ्यावर लागलेले सर्व आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया एल्विशने दिली आहे.


आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही : एल्विश यादव


एल्विश यादव म्हणाला,"सकाळी उठल्यावर माझी बातमी कशी व्हायरल होत आहे हे मला समजलं. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. एक टक्काही यात काही सत्य नाही. माझ्यावर लागलेले सर्व आरोप खोटे आहेत. आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. ज्यांनी कोणी आरोप केलेत त्यांच्याशी माझा कुठलाही संबंध नाही. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करेन". 


एल्विशचा (Bigg Boss OTT Winner Elvish Yadav) शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. अद्याप एल्विश पोलिसांना सापडलेला नाही. पोलिसांनी या रेव पार्टीत 9 साप जप्त केले आहेत. यात पाच कोबरा, एक अजगर आणि दोन साप आहेत. पोलिसांनी पार्टीत 20 एमएल विषही हस्तगत केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान या रेव्ह पार्टीत विदेशातील महिलांसोबत नशा केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. एल्विश यादवला अटक करण्याची मागणी सध्या जोर धरु लागली आहे.


'बिग बॉस' विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल


बिग बॉस विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा एल्विशवर आरोप आहे. एल्विशसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विषारी सापांच्या तस्करीचे एल्विशवर आरोप आहेत. पण या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं एल्विश म्हणाला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांना सहकार्य करण्यास तो तयार आहे.


'बिग बॉस' फेम एल्विश यादव अडचणीत


'बिग बॉस ओटीटी'चा विजेता एल्विश यादव (Bigg Boss OTT Winner Elvish Yadav Winner) अडचणीत आला आहे. प्रसिद्धीझोतात आलेल्या युट्यूबर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेव पार्टीत विषारी सापांचं विष पुरवणं, परदेशी मुलींचा 'सप्लाय' करणं असे अनेक आरोप एल्विशवर लावण्यात आले आहेत.


संबंधित बातम्या


Elvish Yadav : 'बिग बॉस' विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल; ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा आरोप