Ekda Yeun Tar Bagha : 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना विनोदाचा तडका पाहायला मिळणार आहे.


आपली घरची माणसं आपला आधारस्तंभ असतात. आनंदाच्या, दुःखाच्या, यश-अपयशाच्या कोणत्याही प्रसंगात कुटुंबाची साथ-सोबत असेल तर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी साध्य करता येतात. एकमेकांशी असलेले रुसवे-फुगवे आणि छोटय़ा-छोट्या गोष्टींमधून हसत खेळत गमतीदार आयुष्य जगणारं असंच एक भन्नाट फुलंब्रीकर कुटुंब  24 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतं आहे.


फुलंब्रीकर कुटुंबाची आणि त्यांच्या नात्यातील गंमत अनुभवायची असेल तर प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) दिग्दर्शित  'एकदा येऊन तर बघा' हा सिनेमा प्रेक्षकांना पाहावा लागेल. श्रावण, फाल्गुन आणि कार्तिक या तीन भावांची ही गोष्ट म्हणजे 'एकदा येऊन तर बघा' हा सिनेमा आहे.


'एकदा येऊन तर बघा' या सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल? (Ekda Yeun Tar Bagha Movie Story)


फुलंब्रीकर कुटुंब हॉटेल व्यवसाय सुरू तर करतात पण ग्राहक यावेत यासाठी त्यांना काय आणि किती प्रयत्न करावे लागतात? ज्या गिऱ्हाईकांची वाट बघत आहेत ते गिऱ्हाईक हॉटेल मध्ये आल्यावर हे कसे एका प्रॉब्लेम मध्ये अडकत जातात आणि मग पुढे काय होतं ? त्यातून त्यांच्यावर कोणकोणते प्रसंग ओढवतात आणि त्याला ही  मंडळी कशी सामोरी जातात? याची  गमतीशीर गोष्ट म्हणजे 'एकदा येऊन तर बघा' हा सिनेमा.  


कलाकारांची फौज असलेला 'एकदा येऊन तर बघा'


'एकदा येऊन तर बघा' या सिनेमात दमदार कलाकारांची फौज आहे. गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने फुलंब्रीकर कुटुंबात पाहायला मिळणार आहेत. या पाच जणांसोबत सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि कलाकारांची भली मोठी फौज सिनेमात  आहे. हे कुटुंब प्रेक्षकांना निखळ हास्याची मेजवानी देईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रसाद खांडेकरने व्यक्त केला आहे.


'एकदा येऊन तर बघा' कधी रिलीज होणार? (Ekda Yeun Tar Bagha Release Date)


'एकदा येऊन तर बघा' हा सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक प्रसाद खांडेकरने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'एकदा येऊन तर बघा' या विनोदी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 


संबंधित बातम्या


Aali Ga Bhaagabai Song: तेजस्विनी पंडित, वनिता खरात आणि ओंकार भोजने यांचा जबरदस्त डान्स; 'आली आली गं भागाबाई’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला