Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील नवनवे ट्विस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. गेल्या काही दिवसांपासून सायली खोटी प्रेग्नंट असल्याचा ट्रॅक मालिकेत सुरू आहे. पण आता मालिकेच्या आगामी भागात सायली स्वत: ती प्रेग्नंट नसल्याचं सत्य सर्वांना सांगणार आहे. 


'ठरलं तर मग' मालिकेचा रंगणार विशेष भाग 


'ठरलं तर मग' या मालिकेचा विशेष भाग रंगणार आहे. नुकताच महाएपिसोडचा एक प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये कल्पना सायली आणि अर्जुनला सरप्राईज देताना दिसत आहे. सुभेदार कुटुंबाने सायली आणि अर्जुनसाठी एक छोटी पार्टीत आयोजित केली आहे. सायली प्रेग्नंट असल्याने घरातील सर्व मंडळी आनंदी दिसत आहेत. 


प्रोमोच्या सुरुवातीलाच कल्पना सायली आणि अर्जुनचं आई-बाबा होणार असल्याने अभिनंदन करताना दिसत आहे. तसेच 'कुणीतरी येणार येणार गं' या गाण्यावर घरातील सर्व मंडळी थिरकताना दिसत आहेत. सायली हे सहन होत नाही आणि ती जोरात म्हणते,"थांबवा...मी प्रेग्नंट नाही आहे". 'ठरलं तर मग' मालिकेचा विशेष भाग 5 नोव्हेंबर दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे.






सायलीने सत्य सर्वांना सांगितल्यानंतर घरातील मंडळींची काय प्रतिक्रिया असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सायलीच्या प्रेग्नंसीचा कट कोणी रचलाय हेदेखील आता सर्वांसमोर येणार आहे. सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं असून हळूहळू त्यांचं नातं फुलत आहे. त्यांची लव्हस्टोरी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


अस्मिता आणि प्रियाने रचलाय सायलीच्या खोट्या प्रेग्नंसीचा कट


अस्मिता आणि प्रियाने सायलीच्या खोट्या प्रेग्नंसीचा कट रचला आहे. अस्मिताने सायलीच्या ताकात औषध मिसळल्याने तिला चक्कर, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू होतो. त्यामुळे सायली प्रेग्नंट असल्याचा संशय सुभेदार कुटुंबीयांना येतो. दरम्यान नर्सला पैसे देऊन अस्मिता आणि प्रिया सायलीचे खोटे रिपोर्ट्स बनवतात. सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी अस्मिता आणि प्रिया प्रयत्न करत आहेत. 


'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर


'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील ट्वीस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. जुई गडकरी आणि अमित भानुशाली या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. सायली आणि अर्जुनच्या नात्यातले बरेचसे पैलू मालिकेच्या यापुढील भागांमधून उलगडणार आहेत.


संबंधित बातम्या


Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' मालिकेत मोठा ट्विस्ट; सायलीच्या खोट्या प्रेग्नंसीचा कट कोणी रचलाय? सत्य समोर