Vanita Kharat : अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कॉलेजमध्ये असताना रंगभूमीवर ठेवलेलं पहिलं पाऊल ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) पर्यंतचा वनिताचा प्रवास खूपच फिल्मी आहे. न्यूड फोटोशूट (Nude Photoshoot) ते 'कबीर सिंह' (Kabir Singh) सिनेमातील मोलकरीण पुष्पा अशा अनेक कारणांनी वनिता (Marathi Actress) चर्चेत आली आहे.


कोण आहे वनिता खरात? (Vanita Kharat Profile)


वनिता खरात ही मुंबईकर असून मुंबईतील कीर्ती महाविद्यालयात तिने शिक्षण घेतलं आहे. वनिताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पुढे कीर्ती कॉलेजला गेल्यावर तिने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. प्रायोगिक रंगभूमी गाजवल्यानंतर हवा तसा ब्रेक मात्र तिला मिळत नव्हता. अनेक ठिकाणी ऑडिशन देणं तिने सुरू ठेवलं होतं. 


वनिता खरातला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. हास्यजत्रा सुरू असतानाचा तिला 'कबीर सिंह' सिनेमासाठी विचारणा झाली. या सिनेमात तिने साकारलेली पुष्पा मोलकरीण प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. अनेक मिम्सदेखील व्हायरल झाले. 


वनिता खरातचं 'ते' न्यूड फोटोशूट (Vanita Kharat Nude Photoshoot)


वनिता खरात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'कबीर सिंह'मुळे ओळखली जात असली तरी न्यूड फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे. या फोटोशूटमुळे अनेकांचा वनिताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. या फोटोशूटनंतर एकीकडे वनिता ट्रोल होत होती. तर दुसरीकडे चाहते तिच्या धाडसाचं कौतुक करत होते. त्यावेळी या फोटोशूटबद्दल बोलताना वनिता म्हणाली होती,"बॉडी पॉझिटिव्हीटीचा संदेश देण्यासाठी मी हे न्यूड फोटोशूट केलं आहे. या न्यूड फोटोशूटमुळे माझा माझ्या शरीराकडे बघण्याचा दृष्टीकोन बददला आहे". 






वनिता खरातच्या कलाकृतींबद्दल जाणून घ्या... (Vanita Kharat Project)


वनिताने 'कबीर सिंह' सिनेमासह विकी वेलिंगकर, सरला एक कोटी अशा अनेक सिनेमांत काम केलं आहे. तसेच 'राणबाजार' या सीरिजमध्येही तिने विशेष भूमिका साकरली होती. वनिता आता 'सुंदरी' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वनिताच्या एकदा येऊन तर बघा या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Vanita Kharat: ‘सुंदरी’ मालिकेत वनिता खरातची एन्ट्री; लूकनं वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, "फायर है तू"