Telly Masala : महाराष्ट्राचा लाडका जत्रेकरी समीर चौघुले ते मराठा आरक्षणाचा नाट्यसंमेलनाला फटका; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा शंभराव्या नाट्यसंमेलनाला फटका, आंदोलनामुळे सुधीर गाडगीळांचा राजीनामा; मुहूर्तमेढ लांबणीवर
Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाचा नाट्य परिषदेने धसका घेतला असून 5 नोव्हेंबर रोजी सांगलीत होणारा अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या मुहूर्तमेढिचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. नाट्यसंमेलन स्वागताध्यपदी असणाऱ्या सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांनी आंदोलनामुळे राजीनामा दिला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
IFFI : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवड; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
International Film Festival of India : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी (International Film Festival of India) यंदा महाराष्ट्र सरकारकडून तीन मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Samir Choughule : महाराष्ट्राचे लाडके हास्य महारथी समीर चौघुले! लोचन मजनूच्या माध्यमातून महाराष्ट्राला हासवणाऱ्या जत्रेकरीबद्दल जाणून घ्या
Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर समीर चौघुले (Samir Choughule) घराघरांत पोहोचला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील सर्वच जत्रेकरी एकापेक्षा एक आहेत. प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असून परफॉर्मन्स स्टाइल आहे. प्रत्येकाचा ह्युमर वेगळा आहे. पण समीर चौघुले प्रकरण जरा वेगळचं आहे. त्याने साकारलेला लोचन मजनू प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. लोचन मजनूच्या माध्यमातून तो महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Ankur Wadhave : 'चला हवा येऊ द्या'मधील छोटा पॅकेट बडा धमाका अंकुर वाढवे आता गाजवणार रुपेरी पडदा; 'या' सिनेमात दिसणार प्रमुख भूमिकेत
Ankur Wadhave : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता अंकुर वाढवे (Ankur Wadhave) घराघरांत पोहोचला आहे. एकीकडे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या कार्यक्रमाचे चाहते नाराज झाले आहेत. पण या कार्यक्रमातील छोटा पॅकेट बडा धमाका अंकुर वाढवे (Ankur Wadhave) आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mahesh Kale : महेश काळेंचं संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण; ‘ही’ प्रार्थना केली संगीतबद्ध
Shyamchi Aai : 'श्यामची आई' (Shyamchi Aai) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.या चित्रपटाच्या टीझरला आणि ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. चित्रपटाचा लूक ते कथा, संवाद, सादरीकरण याबाबतीत अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी समोर येत असतानाच चर्चा सुरु झाली आहे, ती 'श्यामची आई' चित्रपटातील गाण्यांची. शास्त्रीय संगीताचे उपासक राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे (Mahesh Kale) यांनी साने गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..' ही प्रार्थना नव्या सुरात आणि चालीत गुंफुन आपल्यासमोर गाण्याच्या स्वरूपात आणली आहे.