Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीने दिली गुडन्यूज? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण...?
Sonalee Kulkarni : 'पटलं तर घ्या' या टॉकशोमध्ये सोनाली कुलकर्णीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
![Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीने दिली गुडन्यूज? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण...? marathi actress Sonalee Kulkarni gave good news Find out what the real issue Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीने दिली गुडन्यूज? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण...?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/92642f131d3acfa3a19b29be8971bc9e1675478012272254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sonalee Kulkarni : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनयासोबत सौंदर्याने तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनाली गेल्या वर्षी कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे. सोनाली कधी गुड न्यूज देणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. दरम्यान, सोनालीने 'पटलं तर घ्या' या टॉकशोमध्ये चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सोनाली 'पटलं तर घ्या' या टॉकशोमध्ये सहभागी झाली होती. कार्यक्रमादरम्यान सोनालीला कोणालातरी फोन करून माझ्याकडे गुडन्यूज आहे, असं सांगण्याचा एक टास्क देण्यात आला होता. त्यावेळी सोनालीने तिच्या मॅनेजरला फोन करत पुढल्या महिनाभरातील प्रोजेक्टसंदर्भात माहिती विचारली. तसेच, मला आता हे प्रोजेक्ट करता येणार नाहीत, कारण माझ्याकडे गुडन्यूज आहे, असं सोनाली म्हणाली. सोनाली हा टास्क जिंकल्यामुळे तिचे चाहते आनंदी झाले आहेत. पण सोनाली आता कधी गुडन्यूज देणार याची त्यांना उत्सुकता लागली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी 'पटलं तर घ्या'चा एक प्रोमो आऊट झाला होता. त्यात सोनाली कोणालातरी फोन करत 'आता नाही येऊ शकत, कारण गुड न्यूज आहे', असं सांगताना दिसली होती. त्यामुळे सोनालीच्या घरी पाळणा हलकार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
View this post on Instagram
'पटलं तर घ्या' या कार्यक्रमादरम्यान सोनालीने तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से शेअर केले आहेत. मोठी सोनाली कुलकर्णी आणि तिच्यामध्ये लोकांचा कसा गोंधळ व्हायचा याचा धमाला किस्सा सोनालीने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ती म्हणाली, माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी बोलवण्यात येत असे. त्यावेळी तिथे मोठ्या सोनाली कुलकर्णीचे पोस्टर लागलेले असायचे. माझ्या एन्ट्रीला तिच्या सिनेमांतील गाणी वाजायची. पण तरीदेखील मी एन्ट्री घेत असे. पण आता मी स्वत:ला सिद्ध केलं असून माझी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या प्रकाराचा सामना करावा लागत नाही".
सोनाली पुढे म्हणाली,"माझ्या पहिल्या सिनेमात मी मुख्य भूमिकेत होते. पण तरीदेखील त्या सिनेमात माझा आवाज नव्हता. माझा आवाज भसाडा असण्याने अनेक प्रोजेक्टमधून मला नाकारण्यात आले आहे". सोनालीचा 'मलईकोट्टई वलीबन' (Malaikottai Valiban) हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर सोनालीने नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल अशा अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीनं गुडन्यूज देऊन केलं नवं वर्षाचं स्वागत; अप्सरेच्या पोस्टनं वेधलं लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)