एक्स्प्लोर

Mann Kasturi Re Trailer: त्या रात्री नेमकं काय झालं? 'मन कस्तुरी रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 

भिनय बेर्डे (Abhinay Berde)   आणि   तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)  यांच्या ‘मन कस्तुरी रे’ (Man Kasturi Re) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Mann Kasturi Re Trailer: एका रॅाक कॅान्सर्टद्वारे ‘नाद’ गाण्याचे  जोरदार लाँचिंग झाले. सोशल मीडियावर या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच ‘मन कस्तुरी रे’ (Man Kasturi Re) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या वेळी अभिनय बेर्डे (Abhinay Berde)   आणि   तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) यांनी स्कुटीवरून धमाकेदार एन्ट्री केली. या सोहळ्याला अभिनय आणि तेजस्वीसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. 

सर्वसामान्य घरातून आलेल्या प्रत्येक मुलाची काही स्वप्ने असतात. स्वतःचे घर, एक चांगली नोकरी, आईच् चेहऱ्यावरील हास्य. असंच स्वप्न घेऊन जगणाऱ्या सिद्धांतचं त्याच्या आईवर जीवापाड प्रेम आहे. कॅालेजमध्ये शिक्षण घेत, घरखर्चासाठी नोकरी करून सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या सिद्धांतच्या आयुष्यात श्रुती येते आणि त्याचे पूर्ण आयुष्यच बदलते. श्रुती आणि सिद्धांत एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. मग असे काय होते की, ज्यामुळे त्या दोघांच्या प्रेमाला नजर लागते. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भरपूर सस्पेन्स आणि ट्विस्ट पाहायला मिळत असून एकमेकांसाठीचा द्वेष, सूड भावनाही यात दिसत आहे.  त्यांचे प्रेम एवढ्या टोकाला का पोहोचते, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 

पाहा ट्रेलर: 

 संकेत माने दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' येत्या 4 नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली, मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या इमेन्स डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत. वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्क करणार असून संगीत प्रदर्शनाची धुरा टिप्सने सांभाळली आहे. नितीन केणी यांनी यापूर्वी ‘सैराट’सह अनेक सुपरहिट चित्रपटांच्या निर्मितीची धुरा सांभाळली असून ‘मन कस्तुरी रे’चे प्रस्तुतकर्ता आहेत.

तेजस्वीनं सोशल मीडियावर तिच्या मन कस्तुरी रे चित्रपटातील लूक शेअर केला होता. 'ती...पहाटे पडलेलं गोड स्वप्न. ती...सांजवेळी बहरलेल्या मोगऱ्याचा सुगंध. तिच्या सोबतीचे क्षण हवेहवेसे. तिला पाहता मन कस्तुरी रे! मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय एक गोड हसरा चेहरा ... 'श्रुती' च्या भूमिकेत.. तेजस्वी प्रकाश' असं कॅप्शन तेजस्वीनं तिच्या पोस्टला दिलं. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

'मन कस्तुरी रे' मध्ये दिसणार अभिनय-तेजस्वीची केमिस्ट्री; नवं पोस्टर रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
Embed widget