Manish Kashyap: फेक व्हिडीओ प्रकरणी युट्यूबर मनीष कश्यपच्या अडचणी वाढल्या; पोलीस अॅक्शन मोडमध्ये, बँक अकाऊंट फ्रीज
युट्यूबर मनीष कश्यपचे (Manish Kashyap) बँक अकाऊंट फ्रीज करण्यात आलं आहे. याबाबत बिहार पोलिसांनी माहिती दिली आहे.
Manish Kashyap : तामिळनाडूमध्ये बिहारी मजुरांचे फेक व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोप प्रकरणी बिहारच्या आर्थिक गुन्हे शाखेने युट्यूबर मनीष कश्यप (Manish Kashyap) आणि युवराज सिंह दोघांनाही अटक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून या प्रकरणी सातत्याने छापेमारी सुरु असताना युट्यूबर मनीष कश्यपचे बँक अकाऊंट फ्रीज करण्यात आलं आहे. याबाबत बिहार पोलिसांनी माहिती दिली आहे.
फेक व्हिडीओ केला होता व्हायरल
मनीष कश्यपने तामिळनाडूमध्ये काम करणाऱ्या बिहारी मजुरांचा फेक व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. यासोबतच पोलिसांनी मनीषचे ट्विटर हँडल ब्लॉक केले आहे. मनीष आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केल्याचा दावा काही फेक अकाऊंटवरुन केला जात आहे. पण दोघांनाही अटक करण्यात आली नसल्याचे बिहार पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
तमिलनाडु में कामकाजी बिहार के निवासियों के लिये भ्रामक वीडियो को प्रसारित करने के मामले में आर्थिक अपराध इकाई की अद्यतन कार्रवाई
— Bihar Police (@bihar_police) March 15, 2023
1.आर्थिक अपराध थाना काण्ड सं0-03/23 के प्राथमिकी अभियुक्त मनीष कश्यप एवं युवराज सिंह राजपूत के विरुद्ध गिरफ्तारी हेतु वारण्ट प्राप्त किया गया।(1/7)
5.मनीष कश्यप के नाम से संचालित @manishkashyap43 Twitter हैण्डल पर मनीष कश्यप की गिरफ्तारी की एक छवि (PHOTO) पोस्ट करके असत्य, अफवाह जनक एवं भ्रामक सन्देश फैलाकर लोगों को दिग्भ्रमित करने के आरोप में आर्थिक अपराध थाना काण्ड सं0-05/23 अंकित किया गया है। (5/7)
— Bihar Police (@bihar_police) March 15, 2023
फ्रीज केले बँक अकाऊंट
बिहार पोलिसांनी मनीष कश्यप उर्फ त्रिपुरारी कुमार तिवारीचे बँक अकाऊंट फ्रीज केले आहेत. बिहार पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. बिहार पोलिसांनी शेअर केलेल्या ट्वीट नुसार मनीषच्या बँक अकाऊंटमध्ये लाखो रुपये आहेत.
3. मनीष कश्यप के बैंक खातों में उपलब्ध राशि को फ्रीज कराया गया। इनके SBI के खाते में 3,37,496 रु0, IDFC BANK के खाते में 51,069 रु0, HDFC BANK के खाते में 3,37,463 रुपये तथा SACHTAK Foundation के HDFC BANK के खाते में 34,85,909 रु0 उपलब्ध हैं।कुल राशि 42,11,937 रुपये है।(3/7)
— Bihar Police (@bihar_police) March 15, 2023
कोण आहे मनीष कश्यप?
मनीष कश्यप उर्फ त्रिपुरारी कुमार तिवारी यांनी सिव्हिल इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांनी यूट्यूबवरुन पत्रकारिता करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच 2020 मध्ये मनीषने चणपटिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: