एक्स्प्लोर
बॉयफ्रेण्डसोबत इंडियन स्टाईल रोमान्स करायचाय : मल्लिका

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने आपल्या प्रियकराची सर्वांशी ओळख करुन दिली आहे. मल्लिका पॅरिसला राहणारा रिअल इस्टेट एजंट सायरिल ऑक्जेनफेन्सच्या प्रेमात पडली आहे.
सायरिलसोबत मला इंडियन स्टाईल रोमान्स करायचा आहे, असं म्हणत त्याला मुंबईत बोलवायची इच्छा मल्लिकाने बोलून दाखवली आहे. तिने फेम या लाईव्ह व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवरुन जगभरातल्या चाहत्यांशी सायरिलची ओळख करुन दिली.
'मला सायरिलचा अभिमान आहे. मी त्याला लवकरच मुंबईला बोलवणार आहे. त्याने मला पॅरिसमध्ये फिरवलं आणि फ्रेंच स्टाईल रोमान्स केला. आता मी भारतीय पद्धतीच्या प्रेमाचं दर्शन घडवेन. मी त्याला ताजमहाल दाखवायला नेईन आणि स्ट्रीड फूडही खायला देईन. त्याला टिपीकल इंडियन तडका दाखवायचा आहे.' असं मल्लिका म्हणते.
'मला फळं-भाज्या आवडतात, पण जेवण बनवायला आवडत नाही.' अशी प्रांजळ कबुलीही यावेळी मल्लिकाने दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
