बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडणारा फोटो, अश्लील डान्समुळे मलायका अरोरा ट्रोल, गाणं काढून टाकण्याची मागणी करताच म्हणाली...
हनी सिंहने आपल्या स्टाईलप्रमाणे या गाण्यातही भोजपुरीचा मसाला दिला असून, तो प्रेक्षकांना पसंत पडत आहे.

Malaika Arora: बॉलिवूडमध्ये मुन्नी बदनाम हुई’, ‘छैय्या छैय्या’ आणि ‘अनारकली डिस्को चली अशा गाण्यावर मलायकानं सगळ्यांना थिरकायला भाग पाडलं. बॉलीवूडमध्ये ‘आयटम गर्ल’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या मलायका अरोराने (Malaika Arora) नेहमीच आपल्या स्टाइल, ग्लॅमर आणि डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण अलीकडे तिच्या या प्रतिमेत एक मोठा बदल पाहायला मिळतो आहे असं तिचे चाहते सध्या म्हणतायत. गायक यो यो हनी सिंग यांच्या ‘चिलगम’ या म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनेत्री मलायका अरोराने केलेल्या डान्स बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडणाऱ्या स्टेप्सवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गाण्याभोवती वाद निर्माण झाल्यानंतर मलायकाने खुल्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाली मलायका?
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने सांगितलं की, हनी सिंगसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत मजेशीर होता. ट्रोलिंग आणि टीकेच्या पार्श्वभूमीवरही तिने या म्युझिक व्हिडिओला ‘बोल्ड’ म्हटलंय. मलायका म्हणाली, “‘चिलगम’वर काम करणं खूप मजेदार होतं. हे गाणं बोल्ड आहे आणि अॅटिट्यूडने भरलेलं आहे. यो यो हनी सिंगची एनर्जी इतकी जबरदस्त आहे की सेटवर असताना त्याच्या वाइबशी जुळवून घेणं अवघड होतं,” असं तिने IANS ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. मलायका अरोरा पुढे म्हणते, "हे गाणं तुमचा मूड लगेचच सेट करेल. त्यामुळे मला पडद्यावर माझी बेफिकीर बाजू दाखवण्याची संधी मिळाली. मला वाटते की प्रेक्षकांनाही ती ऊर्जा जाणवेल."
मलायका होतेय प्रचंड ट्रोल
मलायका अरोराच्या म्युझिक व्हिडिओवर सध्या प्रचंड ट्रोलिंग होत आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओचा टीझर शेअर झाल्यानंतर, नेटकऱ्यांनी निराशा व्यक्त केली आणि बॉलीवूड अभिनेत्रीवर टीका केली. काहींनी हे गाणे बोल्ड नाही तर अश्लील असल्याचं म्हटलंय. तर काहींनी निर्मात्यांना ते काढून टाकण्याची विनंती केली. एकाने कमेंट करत लिहिले, तिला डान्स नीट करता न आल्याने ती यात अश्लील वाटत आहे. असं सेम मेरे मेहबूब गाण्यात तृप्तीसोबाठी झालं होतं.प्रथम, हे नृत्यदिग्दर्शक सर्वात अश्लील चाली घेऊन येतात आणि नंतर जर ती अभिनेत्री ते करू शकत नसेल तर ती अश्लील वाटते.

दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले, "मी तुम्हाला हा व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती करतो." दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले, समस्या अशी आहे की हे ना बेधडक आहे, ना आकर्षक… हे फक्त अश्लील आहे. जर खरोखर चांगलं कसं दाखवायचं हे माहिती असेल तरच अशा गोष्टी निभावून नेता येतात. मलायका ज्या जुन्या प्रोजेक्ट्समध्ये होती ते पाहा आणि या व्हिडिओशी तुलना करा."
View this post on Instagram
गाण्याचा टीझर रिलीज झाल्यापासूनच मलायकाचे डान्स मूव्हज, एक्सप्रेशन आणि ओव्हर-ग्लॅमर यावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सुरू आहे. तिच्या जुन्या गाण्यांच्या तुलनेत ही प्रतिक्रिया अगदीच वेगळी आहे. आधी तिला नेहमीच स्टाईल, एलिगन्स आणि परफॉर्मन्ससाठी दाद मिळायची. ट्रोलिंग आणि नकारात्मक कमेंट्स असूनही ‘चिलगम’ गाण्याची लोकप्रियता वाढतच आहे. रिलीजच्या अवघ्या 9 तासांतच गाण्याने 10 मिलियन व्ह्यूज पार केले आहेत. म्हणजेच वाद एका बाजूला असला, तरी गाण्याची कमर्शियल सक्सेस थांबलेली नाही. हनी सिंहने आपल्या स्टाईलप्रमाणे या गाण्यातही भोजपुरीचा मसाला दिला असून, तो प्रेक्षकांना पसंत पडत आहे. मलायकानेही हनी सिंहसोबतचा अनुभव शेअर करताना सांगितलं की या गाण्यावर काम करणं मजेदार आणि एनर्जेटिक होतं.























