एक्स्प्लोर

Mahesh Babu : 1000 बालकांचा वाचवलाय जीव ते दोन गाव घेतली दत्तक; जाणून घ्या 'हिरो नं 1' महेश बाबूच्या सामाजिक कार्याबद्दल

Mahesh Babu : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांनी आता 40 गरीब विद्यार्थांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

Mahesh Babu : टॉलिवूडचा प्रिन्स अर्थात अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) त्याचा अभिनय आणि सिनेमांसाठी ओळखला जातोच. पण सामाजिक कामं करण्यातही तो आघाडीवर आहे. आता अभिनेत्याने 40 गरीब विद्यार्थांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

महेश बाहू सामाजिक कामांमध्ये खूप अग्रेसर आहे. गरजू लोकांना मदत करायला त्याला आवडतं. आता कृष्णा घट्टामनेनी (Krishna Ghattamaneni) यांच्या पुण्यतिथी निमित्त महेश बाबू यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महेश बाबू यांनी गरीब विद्यार्थांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. 

40 विद्यार्थांचा शाळा ते पदवीपर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलणार : महेश बाबू

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, महेश बाबू आणि त्यांची पत्नी नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) यांनी 2020 मध्ये बाबू फाऊंडेशनची स्थापन केली आहे. वडिलांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी महेश बाबू फाउंडेशनतर्फे सुपरस्टार कृष्णा एजुकेशनल फंडची स्थापना केली होती. या शैक्षणिक फंडमार्फत हृदयाचा त्रास असणाऱ्या विद्यार्थांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली. महेश बाबू फाउंडेशनतर्फे विद्यार्थांच्या शिक्षणाचा खर्च करण्यात आला. महेश आणि नम्रता यांचा मुलगा गौतम याला हृदयाचा त्रास असल्याने त्यांनी 40 विद्यार्थांचा शाळा ते पदवीपर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलण्याचा विडा हाती घेतला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

1000 बालकांचा वाचवलाय जीव

महेश बाबू अभिनय, सिनेमे आणि व्यवसायाच्या माध्यमातून चांगलीच कमाई करतात. या कमाईतला 30% हिस्सा ते गरजू लोकांवर खर्च करतात. गरजू लोकांना मदत करणं महेश बाबू यांना आवडतं. महेश बाबू एनजीओ चालवतात. रेन्बो चिल्ड्रन रुग्णालयाचे ते असोसिएट आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, महेश बाबू यांनी 1000 पेक्षा अधिक बालकांची हार्ट सर्जरी करत त्यांचा जीव वाचवला आहे. 

दोन गाव घेतलेत दत्तक

महेश बाबू यांनी दोन गाव दत्तक घेतले आहेत. बुरिपलेम आणि बुरिपलेम ही दोन गावं त्यांनी दत्तक घेतली आहेत. गावातील रस्ते, शाळा, रुग्णालय आणि पिण्याचे पाणी अशा सर्व सुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी महेश बाबू यांनी घेतली आहे.

संबंधित बातम्या

Mahesh Babu Daughter Sitara Fees: वयाच्या 11 व्या वर्षी महेश बाबूची लेक झळकली टाइम्स स्क्वेअरवर; फोटोशूटसाठी सितारानं घेतलं एवढं मानधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget