Maharashtra Shahir Movie: 'फडकेल नव्याने भगवा, महाराष्ट्र पुन्हा गर्जेल...'; केदार शिंदेंनी शेअर केला 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाचा खास व्हिडीओ
नुकताच केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) चित्रपटाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
Maharashtra Shahir Movie: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकताच केदार शिंदे यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
केदार शिंदे यांची पोस्ट
केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अंकुश चौधरी हा शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसत आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'फडकेल नव्याने भगवा, महाराष्ट्र पुन्हा गर्जेल, जनतेचा बुलंद आवाज...लेखणीतूनी बरसेल...देऊनी डफावर थाप.. ललकारत होते जाहीर.. अर्पितो तुम्हाला तुमचे.. तुमचाच.. महाराष्ट्र शाहीर.. शाहीर साबळे ह्यांची भव्य जीवनगाथा 28 एप्रिल 2023 पासून तुमच्या नजीकच्या चित्रपटगृहात.'
महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनीच केलं आहे. तर या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली आहे. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अजय-अतुल यांनी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गाण्याला राज्यगीताचा दर्जा मिळाला. त्यावेळी महाराष्ट्र शाहीर या आगामी चित्रपटामध्ये 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत असणार आहे, अशीही माहिती केदार शिंदे एबीपी माझाला दिली होती. त्यांनी सांगितलं की, अजय-अतुल हे या गाण्याला संगीतबद्ध करणार आहेत.
'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गाण्याला राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी शाहीर साबळे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता.
View this post on Instagram
शाहीर साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष 3 सप्टेंबर 2022 ते 3 सप्टेंबर 2023 दरम्यान साजरे होत आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात रिलीज होणाऱ्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: