Maharashtra Shahir: 'माझा पहिला चित्रपट...'; महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील अभिनेत्री सना शिंदेची खास पोस्ट
महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर सनानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Maharashtra Shahir: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामधील गाण्यांना, चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात अंकुश चौथरीनं शाहीर साबळे यांची भूमिका साकारली असून अभिनेत्री सना शिंदेनं शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता सनानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सनानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये केदार शिंदे, अंकुश चौधरी आणि सनाची आजी दिसत आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'काल माझ्या आजी ‘माई’ ने महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पाहिला आणि तिची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची होती. हा परफेक्ट कॅनडीड फोटो आहे, ज्यामध्ये अंकुश हा आनंदाचा क्षण कॅमेऱ्यात कैद करत आहे. तिने मला भानुमतीशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. हा माझा पहिला चित्रपट आणि तिचा प्रतिसाद हा खूप महत्त्वाचा होता. असच अजून शिकत राहीन, प्रामाणिकपणे काम करत राहीन.'
पाहा फोटो
View this post on Instagram
महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक नेटकरी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अंकुशनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा नेटकऱ्यांनी लिहिलेला रिव्ह्यू दिसत आहे. यामध्ये काही युझर्सनं महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अजय-अतुल यांनी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :