Maharashtra Bhushan Puraskar: गाणं लोकांना आवडेल की नाही, हे आधीच कळतं का? सुमीत राघवनचा प्रश्न; आशा भोसले म्हणाल्या...
आशा भोसले (Asha Bhosle) यांना महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता सुमीत राघवननं (Sumeet Raghavan) आशा भोसले यांना काही प्रश्न विचारले.
Maharashtra Bhushan Puraskar: ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना राज्य सरकारच्यावतीनं महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. काल गेट वे ऑफ इंडिया येथे एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आशा भोसले यांनी त्यांच्या काही आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित होते. या कार्यक्रमात अभिनेता सुमीत राघवननं आशा भोसले यांना काही प्रश्न विचारले.
सुमीत राघवननं आशा भोसले यांना प्रश्न विचारला की, 'एखादं गाणं लोकांना आवडेल की नाही, हे तुम्हाला आधीच कळतं का?' आशा भोसले यांनी सुमीत राघवनच्या या प्रश्नाला उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, 'माणूस आयुष्यात काय करेल? हा अंदाज तर देवाला पण लावता येणार नाही. त्याला देखील हा प्रश्न पडत असेल. 400 कोटींचा चित्रपट बनवणारे चित्रपट निर्माते हे सहा महिने चित्रपटाच्या कथानकासाठी तर सहा महिने डायलॉग्ससाठी घालवतात. त्यानंतर ते निर्माते म्हणतात, हा चित्रपट हिट आहे. पण तो चित्रपट 200 कोटींची कमाई देखील करत नाही. एखादे गाणे चालेल की नाही? हे कोणी सांगू शकत नाही. आम्हाला वाटतं की, हे गाणं खूप छान आहे. पण ते लोकांना आवडणार नाही, असंही होऊ शकतं. लोकांचा मूड कसा असतो? ते कळत नाही. पण माझ्याबाबत प्रेक्षकांचा मूड खूप चांगला होता. गेली अनेक वर्ष ते मला ऐकत आहेत.'
सांगितल्या पहिल्या गाण्याच्या आठवणी
आशा भोसले यांनी त्यांच्या पहिल्या गाण्याची आठवण सांगितली. त्या म्हणाल्या, "कोल्हापुरात 10 वर्षे वयाची असताना, 1943 साली मी पहिलं गाणं गायलं. त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते, मी थरथर कापत होते. असं वाटलं की हा माईक घेऊन कोणीतरी जावं, मला पळून जावं असं वाटलं होतं. तरीही मी त्या वेळी गायलं. कारण पळून गेले असते तर घरच्यांनी मला मारलं असतं. 1946 साली मी हिंदी फिल्म लाईनमध्ये गायला सुरुवात केली. त्यानंतर आतापर्यंत 10 हजार गाणी गायली. संगीतप्रेमींनी माझं गाणं ऐकलंच नसतं तर मी इथेपर्यंत आलेच नसते. असंच आपलं प्रेम राहू दे."
महत्वाच्या इतर बातम्या: