एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

'महाभारत'चे इंद्रदेव आणि हिंदी, पंजाबी चित्रपटांचे सुप्रसिद्ध अभिनेते सतीश कौल यांचे कोरोनामुळे निधन

गेल्या अनेक वर्षांपासून सतीश कौल यांचे आयुष्य लुधियानामध्ये भाड्याच्या घरात सुरु होते.

मुंबई : बीआर चोप्रा यांच्या अत्यंत लोकप्रिय 'महाभारत'मध्ये इंद्र देवाची भूमिका साकारणारे हिंदी/पंजाबी अभिनेते सतीश कौल यांचे कोरोनामुळे निधन झाले. एका आठवड्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्हवर आल्यानंतर त्यांना लुधियाना येथील श्री रामा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ते 72 वर्षांचे होते.

गेल्या काही वर्षांपासून सतीश कौल यांची काळजी घेत असलेल्या सत्या देवी यांनी लुधियानाहून फोनवर या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या लुधियाना येथे केला जाणार आहे.

सतीश कौल यांनी सुमारे 300 हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'महाभारत', 'सर्कस' आणि 'विक्रम वेताळ' या अतिशय लोकप्रिय मालिकांमध्ये ते वेगवेगळ्या पात्रांमध्ये दिसले होते. पण सतीश कौल यांचे आयुष्य आजारपण आणि आर्थिक संकटामध्ये सुरु होते. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये सतीश कौल यांना लुधियानाच्या एका छोट्या घरात राहण्यास भाग पडले. दर महिन्याला त्यांना घरभाडे आणि औषधांसाठी पैसे मिळावण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

पटियालामध्ये पडल्यामुळे हिप हाड फॅक्चर झाल्याने त्यांना चंदीगडच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. ते मरेपर्यंत या आजारातून उभे राहू शकले नाही. बऱ्याच वर्षानंतरही त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हती. अडीच वर्षे रुग्णालयात राहिल्यानंतर सतीश कौल दीड वर्षे वृद्धाश्रमात राहिले.

सुमारे 25 वर्षांपूर्वी त्यांनी पालकांच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी मुंबईतील वर्सोवा येथे त्यांचा फ्लॅट अडीच लाख रुपयांना विकला. उर्वरित पैशांमधून त्यांनी लहान बहिणीचे लग्न देखील केले. काही वर्षांपूर्वी लुधियानामध्ये त्यांनी एक अभिनय शाळादेखील भागीदारीत उघडली होती. पण, यात त्यांना 20 लाख रुपयांहून अधिक रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.

सतीश कौल यांचा लग्नाच्या एक वर्षानंतरच पत्नीपासून घटस्फोट झाला होता. बायकोने पुन्हा लग्न केले आणि एका मुलासह डर्बन (दक्षिण आफ्रिका) येथे राहायला गेली. स्वतःला सतीश कौल फॅन म्हणून वर्णन करणारी सत्या देवी गेली 7 वर्षे त्यांची काळजी घेत होती. 69 वर्षीय सत्या देवी आणि सतीश कौल यांच्या नात्याबद्दल लोकांनी नावं उठली. मात्र, सर्वात वाईट काळातही सत्या देवीने त्यांचा मृत्यू होईपर्यंत साथ सोडली नाही.

1969 मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (FTII) शिकत असताना जया बहादुरी, डॅनी डेंगजोप्पा, आशा सचदेव, अनिल धवन हे त्यांचे बॅचमेट होते. शिक्षण संपल्यानंतर सतीश कौल यांना बर्‍याच पंजाबी चित्रपटात नायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलंय, पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. दिलीप कुमार, देव आनंद, विनोद खन्ना यांच्या सारख्या बॉलीवूड कलाकारांसोबत त्यांनी काम केले असले तरी. त्यांना बॉलिवूडमध्ये जी प्रसिद्धी मिळाली ती पंजाबी चित्रपटांतून मिळाली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
Embed widget