एक्स्प्लोर
VIDEO : माधुरीच्या 'बकेट लिस्ट'चा ट्रेलर रिलीज
'बकेट लिस्ट'मध्ये माधुरी ही 'मधुरा साने' या सर्वसामान्य गृहिणीच्या भूमिकेत आहे.

मुंबई : 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा पहिला वहिला मराठी सिनेमा 'बकेट लिस्ट'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. माधुरीची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा 25 मे रोजी प्रदर्शित होत आहे. 'बकेट लिस्ट'मध्ये माधुरी ही 'मधुरा साने' या सर्वसामान्य गृहिणीच्या भूमिकेत आहे. हृदय दान करणाऱ्या सईची बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा ध्यास मधुरा घेते. त्यानंतर काय होतं, हे मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. माधुरीसोबत सुमित राघवन मुख्य भूमिकेत असून वंदना गुप्ते, इला भाटे, शुभा खोटे, रेणुका शहाणे, दिलीप प्रभावळकर, मिलिंद फाटक अशी कलाकारांची फौज या सिनेमात आहे. 'हम आपके है कौन?' नंतर माधुरी-रेणुका यांना एकत्र पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूरही यानिमित्ताने मराठीत झळकणार आहे. रणबीर या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.
तेजस देऊस्करने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. दार मोशन पिक्चर्स, डार्क हॉर्स सिनेमाज आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'बकेट लिस्ट- माझी, तुमची.. आपल्या सगळ्यांची' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. पाहा ट्रेलर :
तेजस देऊस्करने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. दार मोशन पिक्चर्स, डार्क हॉर्स सिनेमाज आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'बकेट लिस्ट- माझी, तुमची.. आपल्या सगळ्यांची' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. पाहा ट्रेलर : आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
पुणे
निवडणूक























