एक्स्प्लोर
Madhuri Dixit Nene unhappy with Jacqueline Fernandez's Ek do teen? latest update
जॅकलीन माधुरीची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या प्रयत्नात होती, मात्र माधुरी तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबई : श्रीलंकन ब्यूटी जॅकलीन फर्नांडिसने माधुरी दीक्षितला ट्रिब्युट म्हणून 'तेजाब' चित्रपटातील गाजलेल्या 'एक दो तीन' या गाण्याचं रिक्रिएशन केलं. मात्र जॅकलीनचा हा प्रयत्न माधुरीला रुचलेला दिसत नाही. माधुरी जॅकलीनचा डान्स पाहून नाखुश असल्याचं म्हटलं जात आहे.
1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेजाब चित्रपटातील हे गाणं अलका याज्ञिक यांनी गायलं होतं. दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांनी गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं. मूळ गाण्यात बॅक डान्सर असलेल्या गणेश आचार्यने नव्या 'एक दो तीन'ची कोरिओग्राफी केली आहे.
'बागी 2' चित्रपटातील 'एक दो तीन' गाणं रीलिज झाल्यानंतर जॅकलीन आणि माधुरी यांची तुलना होणं साहजिकच होतं. मात्र तेजाब चित्रपटातील माधुरीचा नृत्याविष्कार अलौकिक होता, असं तिचे चाहते आवर्जून सांगतात. जॅकलीन नव्या गाण्यात हॉट दिसत असली, तरी माधुरीने ग्रेसफुली डान्स केल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
जॅकलीनचा 'एक दो तीन' पाहून तेजाबचे दिग्दर्शक एन. चंद्रा आणि सरोज खान यांनीही नाक मुरडलं होतं. एन चंद्रा यांनी तर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी दाखवली आहे. जॅकलीन माधुरीची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या प्रयत्नात होती, मात्र माधुरी तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलं जात आहे.
याआधी, 'बद्रिनाथ की दुल्हनिया' चित्रपटात मूळ माधुरी झळकलेल्या 'तम्मा तम्मा' या गाण्यावर वरुण धवन आणि आलिया भट यांनी रिक्रिएशनल डान्स केला होता. तेव्हा, माधुरीने त्यांच्या सरावालाही हजेरी लावली होती. इतकंच काय, तिने आपल्या दोन ओरिजिनल स्टेप्सही दोघांना शिकवल्या होत्या. म्हणजेच माधुरीला रिक्रिएशन करण्याबाबत कोणतीही आडकाठी नाही. त्यामुळे जॅकलीनकडे माधुरी करत असलेलं दुर्लक्ष हे डान्सबाबत नापसंतीचं चिन्हं मानलं जात आहे.
गाणं रीलिज झाल्यावर सोशल मीडियावरही जॅकलीनला ट्रोल करण्यात आलं होतं. फक्त सलमान खानने जॅकलीनचं कौतुक करत तिने माधुरीच्या परफॉर्मन्सला पुरेपूर न्याय दिल्याचं म्हटलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement