एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mad Kelay Tu Latest Marathi Song: महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब आणि विशाल राठोडचा रोमँटिक अंदाज; 'म्याड केलंस तू' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

शिवाली परब (Shivali Parab) आणि विशाल राठोड (Vishal Rathod ) यांचा रोमँटिक अंदाज 'म्याड केलंस तू' या गाण्यात प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. 

Mad Kelay Tu Latest Marathi Song: सोशल मीडिया वर विशाल राठोड यांचे प्रमुख भूमिकेत असलेले नवीन कोरे मराठी गाणं "म्याड केलंय तू" प्रदर्शित झालंय.  महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब (Shivali Parab) आणि विशाल राठोड (Vishal Rathod ) यांचा रोमँटिक अंदाज या गाण्यात प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. 
   
खानदेशाचा असणारा विशालच्या कलेची जिद्द या गाण्यातून पडद्यावर रेखाटतेय. विशाल राठोड सोबत या गाण्यात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब झळकणार असून व्ही.आर. म्युझिक या यूट्यूब चॅनल वर हे गाणे प्रदर्शित होणार आहे. 'म्याड केलंस तू' म्हणत प्रेमाची परिभाषा मांडणारे असे आणि तरुणाईला भुरळ पाडणारे हे अल्बम सॉंग रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकवायला सज्ज झाले आहे. 12 मार्चला या गाण्याचा टीझर आला तेव्हापासून गाण्याची चर्चा सुरु आहे, आता मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून हे गाण ही प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला तर अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. या लव्हेबल प्रेमकहाणीला सागर जनार्दन याने संगीत दिलंय. तर या गाण्याचे बोल सागर जनार्दन आणि रोहन साखरे यांनी शब्दबद्ध केले आहेत. तर या रोमँटिक गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि लरीसा अलमेडिया यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केलंय. संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनीष महाजन याने पेलवली आहे तर संपूर्ण गाण्याला छायाचित्रकार सूरज राजपूत याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. सीएम राठोड यांनी गाण्याच्या निर्मितीची बाजू उत्तमरीत्या पेलवली आहे. विशाल राठोड आणि शिवाली परब यांची लव्हेबल केमिस्ट्री या गाण्यात पाहणं उत्सुकतेच ठरतंय. 

विशालने या आधी देखील उत्तम कलाकृती अशा मराठी सिनेक्षेत्रात दिल्या आहेत. 10 हून अधिक सुपरहिट मराठी आणि बंजारा अल्बमसाठी विशालने अविरत मेहनत घेतली आहे. विशाल हा मूळचा वडगाव अंबे पाचोरा तालुक्याचा असून त्याने सुरु केलेला अत्यंत मेहनतीचा प्रवास आजही तितक्याच ताकदीने विशाल पेलवत आहे. या गाण्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाचं असणार सिनेसृष्टीविषयीचं स्वप्न नव्याने पूर्ण होताना दिसतंय. निर्मिती आणि अभिनय या सोबतच विशाल स्वतः एक व्यवसायिक आहे. एम.बी.ए फायनान्समध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या विशालला कायमच चित्रपट क्षेत्र आणि नृत्याची आवड आहे. 
      
चित्रपट क्षेत्रात काही उल्लेखनीय काम करु पाहणाऱ्या तरुणांसाठी विशाल कायमच एक आदर्श ठरेल यात वाद नाही. विशाल आणि शिवालीचे हे नवे रोमँटिक सॉंग तरुणाईच्या मनावर राज्य करतंय यांत शंकाच नाही.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Zwigato Twitter Review: कसा आहे कपिल शर्माचा Zwigato चित्रपट? नेटकरी म्हणतात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget