एक्स्प्लोर
Advertisement
'इंदू सरकार'च्या निर्मात्यांना नोटीस, सिनेमाच्या बंदीची मागणी
मुंबई : ‘इंदू सरकार’ सिनेमाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. या सिनेमात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या सिनेमावर बंदी आणावी, अशी मागणी प्रिया सिंग पॉल यांनी केली आहे.
प्रिया सिंग यांनी ही नोटीस पाठवताना आपण संजय गांधी यांची मुलगी असल्याचा उल्लेख केला आहे. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना याबद्दल जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की संजय गांधी यांना वरुण गांधी नावाचा फक्त एक मुलगा आहे. त्यामुळे नोटीस पाठवणारी ही मुलगी कोण, हे जोपर्यंत गांधी घराणं स्पष्ट करत नाही, तोपर्यंत यावर कसलंच भाष्य करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा सिनेमा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीवर आधारित आहे.
अभिनेते अनुपम खेर, नील नितीन मुकेश यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. नील नितीन मुकेश या सिनेमात दिवंगत काँग्रेस नेते संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.
आणीबाणीच्या काळात नागरिकांना झालेला त्रास आणि देशातील आणीबाणीची परिस्थिती या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 28 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होईल.
'इंदू सरकार'चा ट्रेलर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement