Kushal Badrike: कुशल बद्रिके पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत; साकारणार ‘रावरंभा’ चित्रपटातील 'कुरबतखान' ही भूमिका
विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर कुशल (Kushal Badrike) प्रथमच नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात तो क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ ही भूमिका साकारणार आहे.
Kushal Badrike: आपल्या कॉमेडी टायमिंगनं प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आता वेगळ्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. त्याचं हे रूप भल्याभल्यांना धडकी भरवणार आहे. ‘रावरंभा’ (Ravrambha) या ऐतिहासिक चित्रपटात तो क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ ही भूमिका साकारणार आहे. विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर कुशल प्रथमच ऐतिहसिक आणि नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. येत्या 12 मे ला इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ रुपेरी पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’ ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.
बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला ‘कुरबतखान’ हा विजापूरचा क्रूर हेर होता. ‘बघणाऱ्याला चीड येईल अशी ही भूमिका साकारणं हे खरंतर माझ्यातल्या अभिनेत्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारलीय. प्रेक्षकांच्या ती पसंतीस पडेल, अशी मला खात्री आहे’, असं कुशल सांगतो.
View this post on Instagram
शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. साहसदृश्ये शेवोलिन मलेश यांची आहेत. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनीसंकलन दिनेश उच्चील, शंतनू अकेरकर यांचे आहे. प्रशांत नलवडे निर्मिती व्यवस्थापक आहेत. 12 मे ला 'रावरंभा' ही ऐतिहासिक प्रेमकहाणी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल घराघरांत पोहोचला. कुशलचा पांडू हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Kushal Badrike : कुशल बद्रिकेची खास पोस्ट ; म्हणाला, 'माझ्या आयुष्यात प्रेयसीची जागा...'