एक्स्प्लोर
राज कपूर यांच्या पत्नीचं निधन, बॉलिवूड शोकाकूल
राज कपूर यांनी 1946 मध्ये कृष्णा मल्होत्रा यांच्याशी विवाह केला होता.
मुंबई : बॉलिवूडचे शोमॅन, महान अभिनेते आणि दिग्दर्शरक राज कपूर यांची पत्नी कृष्णा राज कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी आईच्या निधनाची माहिती देताना म्हटलं आहे की, हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे पाच वाजता त्यांचं निधन झालं. वाढत्या वयोमानानुसार अनेक लहान-मोठ्या तक्रारी त्यांना होत्या. आईच्या निधनामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. या दु:खद वृत्तानंतर कपूर कुटुंब आणि बॉलिवूड शोकात आहे.
राज कपूर यांनी 1946 मध्ये कृष्णा मल्होत्रा यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला पाच अपत्य होती. यामध्ये मुलगा रणधीर, ऋषी, राजीव आणि रितू, रीमा या दोन मुलींचा समावेश आहे. तर अभिनेता रणबीर कपूर, करीना कपूर आणि करिश्मा कपूर हे त्यांचे नातवंड आहेत.
कपूर कुटुंबाकडून ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूरने इन्स्टाग्रामद्वारे आजी कृष्णा कपूर यांच्या आठवणीत एक खास फोटो शेअर केला आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि आयुष्यभर करत राहिन. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो, आजी, असं रिद्धिमाने फोटो शेअर करताना लिहिलं आहे.
View this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement