(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kranti Redkar : "क्रांती खूप धाडसी आहे", समीर वानखेडेंकडून पत्नीचं कौतुक; म्हणाले, "धमक्यांना..."
Sameer Wankhede Praises Wife : अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडे यांनी तिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
Sameer Wankhede Praises Wife : सेलिब्रिटीच्या प्रोफेशनल लाइफप्रमाणेच त्यांची पर्सनल लाइफही चर्चेत असते. अनेक वेळा त्यांच्या पोस्ट आणि वक्तव्य व्हायर होत असतात. अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडे यांनी पत्नीचं कौतुक केलं आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी एका मुलाखतीत पत्नी क्रांती रेडकरबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. समीर वानखेडे यांनी पत्नी क्रांती रेडकरचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. यामुळे हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
"क्रांती खूप धाडसी आहे"
अलिकडेच अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी समीर वानखेडेंनी क्रांतीबद्दल कौतुकाचे बोल काढले. सन मराठीच्या 'होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा' कार्यक्रमात बोलताना समीर वानखेडे म्हणाले की, क्रांती खूप धाडसी आहे. आम्हाला धमक्या येत होत्या, पण, तिने संकटाचा सामना केला. समीर वानखेडे यांनी क्रांतीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.
समीर वानखेडेंकडून पत्नीचं कौतुक
समीर वानखेडे यांनी यावेळी सांगितलं की, फ्रेबुवारी-मार्चमध्ये क्रांतीला माझ्याबद्दल, आमच्या मुलांबद्दल धमक्या येत होत्या, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ती एक महिला आणि माझी पत्नी आहे फक्त म्हणून तिला धमक्या देण्यात येत होत्या. त्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली. मात्र, ती खूप धाडसी असल्यामुळे तिने या परिस्थितीचा योग्य प्रकारे सामना केला. मी तिला म्हणतो, ती झाशीची राणी आहे. मी लोकांना सांगायचो, माझ्या आधी तुम्हाला माझी लक्ष्मी आणि दुर्गेला सामोरं जावं लागेल.
या प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत
समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी आहेत. समीर वानखेडे अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) मुंबई विभागाचे माजी संचालक होते. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडे यांनी कारवाई केली होती. वानखेडेंनी आर्यन खानला अटक केल्यावर त्याची खूप चर्चा झाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :