Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8'च्या आगामी भागात हजेरी लावणार विकी कौशल अन् कियारा आडवाणी; करण जोहरसोबत करणार धमाल
Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8'च्या आगामी भागात विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) हजेरी लावणार आहेत.
Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाच्या आगामी भागाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
'कॉफी विथ करण 8' हा कार्यक्रम करण जोहर (Karan Johar) होस्ट करत आहे. करण जोहर 'कॉफी विथ करण 8'च्या कार्यक्रमात विकी आणि कतरिनाला प्रश्न विचारताना दिसणार आहे. व्यावसायिक आयुष्यासंबंधित वैयक्तिक आयुष्यावर ते भाष्य करतील. करण आणि विकीचा हा एपिसोड खूपच मजेशीर असणार आहे.
विकी कौशल आणि कियारा आडवाणीचा 'गोविंदा मेरा नाम' (Govinda Mera Naam) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी विकी आणि कियारा 'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर हजेरी लावणार आहेत.
'कॉफी विथ करण 8' कायमच चर्चेत!
'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचे सर्वच पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता 'कॉफी विथ करण 8' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'कॉफी विथ करण 8'च्या पहिल्या भागात रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) हजेरी लावली होती. या भागात दीपिकाने रणवीरसोबतच्या रिलेशनबद्दल भाष्य केलं. सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) दुसऱ्या भागात सहभागी झाले होते. त्याने इंडस्ट्रीसंबंधित अनेक धक्कादायक विधाने केली. त्यानंतर सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) हजेरी लावली असून त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित भाष्य केलं. चौथ्या भागात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांनी हजेरी लावली होती. आता विकी आणि कियाराच्या आगामी भागाची चाहत्यांना उत्सुकता आहे. विकी कौशल आणि कियारा आडवाणी यांनी 'कॉफी विथ करण 8'च्या भागात शूटिंगदरम्यान चांगलीच मजा केली आहे.
विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' ओटीटीवर रिलीज!
विकी कौशल आणि मानुषी छिल्लरचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' (The Great Indian Family) हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. सिनेमागृहात जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला होता. आता ओटीटीवर किती धुमाकूळ घालणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा सप्टेंबर महिन्यात सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. या विनोदी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सिनेमागृहात रिलीज झाल्याच्या दीड महिन्यांनी आता सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.