Koffee With Karan 7 : कॉफी विथ करणमध्ये गौरी खान सुहानाला देणार डेटिंग टिप्स; म्हणाली, 'एकाच वेळी दोन मुलांना डेट करु नको'

नुकताच  'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या कार्यक्रमाच्या नव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे.

Continues below advertisement

Koffee With Karan 7 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा (karan johar)  'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा टॉक शो चर्चेत असतो. सध्या या कार्यक्रमाचा सातवा सिझन सुरु आहे. वेगवेगळे सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावतात. नुकताच या कार्यक्रमाच्या नव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, गौरी खान (Gauri Khan), माहीप कपूर (Maheep Kapoor) आणि भावना पांडे (Bhavna Panday) या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये गौरी ही सुहानाला डेटिंग टिप्स देताना दिसत आहे. 

Continues below advertisement

कॉफी विथ करणच्या नव्या एपिसोडचा प्रोमो करण जोहरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'या फॅब्युलस लेडिज येत आहे. गुरूवारी 12 वाजता डिज्नी प्लस हॉस्टारवर पाहा कॉफी विथ करणचा नवा एपिसोड' एपिसोडमध्ये करण हा गौरीला प्रश्न विचारतो की, 'जर तुला शाहरुख आणि तुझ्या लव्ह स्टोरीला एखाद्या चित्रपटाचं नाव द्यायाला सांगितलं तर तू कोणतं नाव सांगशील. यावर गौरी म्हणाली, ;दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे.'

गौरीनं सुहाना दिल्या डेटिंग टिप्स

प्रोमोमध्ये करण हा गौरीला प्रश्न विचारतो की, तू सुहानाला कोणती डेटिंग टिप देशील? करणच्या या प्रश्नाचं गौरी उत्तर देते, 'कधीच एकाच वेळी दोन मुलांना डेट करु नको.' गौरीच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. 

पाहा प्रोमो: 

कॉफी विथ करणचा आगामी एपिसोड तुम्ही गुरुवारी 12 वाजता पाहू शकता. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

 

Koffee With Karan 7: कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडचा मजेशीर प्रोमो रिलीज; ईशान, सिद्धांत अन् कतरिना करणार धमाल!

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola