Koffee With Karan 7 : बॉलिवूडमधील दिग्दर्शक करण जोहरचा (karan johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा टॉक शो चर्चेत असतो. सध्या या कार्यक्रमाचा सातवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. वेगवेगळे सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावतात. नुकताच या कार्यक्रमाच्या नव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये फोन भूत (Phone Bhoot) या चित्रपटातील कलाकार हे धमाल करताना दिसत आहेत.  अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि ईशान खट्टर (Ishaan Khattar)  यांनी कॉफी विथ करणच्या नव्या एपिसोडमध्ये हजेरी लावली. या एपिसोडमध्ये ईशान, कतरिना आणि सिद्धांत हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती दिली. 


करण जोहरनं विचारले प्रश्न


ईशान, कतरिना आणि सिद्धांत यांना करण जोहरनं त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले. प्रोमोमध्ये दिसत आहे की, करण जोहर सिद्धांतला त्यांच्या  रिलेशनशिपबद्दल विचारतो. या प्रश्नाला  सिद्धांत उत्तर देतो की, 'मी सिंगल आहे. मी एवढा सिंगल आहे की, माझ्यासोबत राहून ईशान सिंगल झाला आहे.' कॉफी विथ करण 7 मध्ये कतरिना, सिद्धांत आणि ईशान हे त्यांच्या फोन भूत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून हा हॉरर कॉमेडी चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.


पाहा प्रोमो: 






कॉफी विथ करणचा आगामी एपिसोड तुम्ही गुरुवारी 12 वाजता पाहू शकता. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Koffee With Karan 7 : ‘मी पहिली ऑडिशन तुझ्या स्टुडंट ऑफ द इयरसाठी दिली होती’, क्रितीचं बोलणं ऐकून उडाला करणच्या चेहऱ्याचा रंग!