Sonu Sood Snake Video : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood Snake Video) त्याच्या अभिनयासोबतच लोकांना मदत करण्यासाठी देखील ओळखला जातो. शिवाय तो आपल्या कृतीतून लोकांना खास संदेश देत असतो. आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सोनू सूद (Sonu Sood Snake Video) याने सळसळ करत रस्त्यावरुन जाणारा साप सहजरित्या पकडला आणि गोणीत भरलाय. हा व्हिडीओ सोनू सूदने (Sonu Sood Snake Video) त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलाय. शिवाय त्याने यावेळी लोकांना एक खास मेसेज देखील दिलाय. 

या व्हिडीओमध्ये सोनू सूद म्हणतो, हा आमच्या सोसायटीत आला होता. हा एक रॅट Snake आहे. हा बिनविषारी आहे. पण साप आला आला तर काळजीपूर्वक वावरलं पाहिजे. काहीवेळा साप आपल्या सोसायटीमध्ये येऊ शकतो. तर संबंधित प्रोफेशनल लोकांना बोलवलं पाहिजे. मला पकडायला येतंय. म्हणून मी पकडला आहे. पण आपण काळजी घेणे, अतिशय महत्त्वाचे आहे. 

सोनू सूदने (Sonu Sood Snake Video) त्याच्या पत्नीचा अपघात झाल्यानंतरही लोकांसाठी एक खास मेसेज शेअर केला होता. कारमध्ये बसल्यानंतर सीट बेल्ट घालणे किती महत्त्वाचे आहे? याबाबत सोनू सूदने भाष्य केलं होतं. सीट बेल्ट घातलेला असल्यामुळे सोनू सूदची पत्नी अपघातातून वाचली होती. त्यामुळे त्याने सर्वांना सीट बेल्ट घालण्याचं आवाहन केलं होतं. 

याशिवाय सोनू सूद महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्याला बैलजोडी घेऊन देत त्याची मदत केली होती. लातूर जिल्ह्यातील एक वृद्ध दाम्पत्य स्वत:ला औताला जुंपत जमिनीची मशागत करत होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर अभिनेता सोनू सूद याने या दाम्पत्याला मदतीची घोषणा केली. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत होता. शिवाय एका पत्रकाराने सोनू सूदच्या मदतीबाबत शंका व्यक्त केल्यानंतर त्याने त्याच्या बँकेचं स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल केलं होतं. पत्रकाराच्या आरोपांना सोनू सूदने चोख प्रत्युत्तर दिलं होतं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

नभ ऊतरु आलं, जान्हवी किल्लेकरच्या नव्या लूकची चर्चा, कोल्हापुरात खास फोटोशूट

पुढच्या महिन्यात रिंकू राजगुरुचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, मराठीतील दिग्गज स्टारसोबत झळकणार