OTT Release This Week : कोरोनाकाळानंतर प्रेक्षक ओटीटी (OTT) माध्यमाकडे वळू लागले आहेत. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातदेखील 'जामताडा 2', 'बबली बाउंसर', 'अतिथी भूतो भव'सारखे अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ड्यूड सीझन 2 : कधी होणार प्रदर्शित? 20 सप्टेंबरकुठे होणार प्रदर्शित? अॅमेझॉन मिनी टीव्ही

'ड्यूड सीझन 2' ही अॅमेझॉन मिनी टीव्हीची वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या सीझनमध्येदेखील प्रेक्षकांना रोमांच, ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 20 सप्टेंबरपासून प्रेक्षकांना ही वेबसीरिज पाहता येणार आहे. 

हश - हशकधी होणार प्रदर्शित? 22 सप्टेंबर कुठे होणार प्रदर्शित? अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ

'हश - हश' ही वेबसीरिज 22 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये सोहा अली खान आणि कृतिका कामरा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या वेबसीरिजच्या माध्यमातून 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री जूही चावला ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. 

जामताडाकधी होणार प्रदर्शित? 22 सप्टेंबर कुठे होणार प्रदर्शित? नेटफ्लिक्स

गुन्हेगारीवर आधारित 'जामताडा' या वेबसीरिजचा दुसरा सीझन या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यामुळे प्रेक्षक दुसऱ्या सीझनची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. आता नेटफ्लिवर प्रेक्षकांना ही वेबसीरिज पाहायला मिळणार आहे. 

बबली बाउंसरकधी होणार प्रदर्शित? 23 सप्टेंबर कुठे होणार प्रदर्शित? डिज्नी प्लस हॉटस्टार

'बबली बाउंसर' हा सिनेमा या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मधुर भंडारकरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 23 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहे. 

अतिथि भूतो भव:कधी होणार प्रदर्शित? 23 सप्टेंबरकुठे होणार प्रदर्शित? झी 5

'अतिथि भूतो भव:' हा विनोदी सिनेमा या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं कथानक प्रतीक श्रीकांत शिरोडकरभोवती फिरतं. या सिनेमात जॅकी श्रॉफ, शरमीन सेगल आणि दिविना ठाकुर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

संबंधित बातम्या

Brahmastra : 'ब्रह्मास्त्र'नं 200 कोटींचा टप्पा केला पार; दहाव्या दिवशी केली 'एवढी' कमाई

KGF Chapter 2 : ‘केजीएफ 2’मुळे मेकर्स झाले मालामाल; प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या चित्रपटाने मिळवला तब्बल पाचपट नफा!