Rinku Rajguru Better Half Chi Love Story film : मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हिचा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) आता मराठीतील ज्येष्ठ अभिनेते सुबोध भावे यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिची देखील महत्त्वाची भूमिका आहे. बेटर हाफची लव्हस्टोरी असं त्यांच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केलं असून रजत अग्रवाल यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाचं पोस्टर अल्ट्रा मराठीच्या पेजवरुन शेअर करण्यात आलंय.
रिंकू राजगुरु ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील अकलूजची आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिला सैराट सिनेमात आर्चीच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा संधी दिली. 2016 साली रिंकू राजगुरुचा सैराट हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रिंकूला खरी ओळख मिळाली ती 'सैराट' या चित्रपटामुळे. तिच्या या भूमिकेमुळे तिला अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली. आर्चीच्या बंडखोर, धीट, पण मनमिळाऊ स्वभावाचे अतिशय नैसर्गिक आणि प्रभावी सादरीकरण रिंकूने केलं. या भूमिकेने रिंकू एका रात्रीत महाराष्ट्रातली घराघरात पोहोचली. ग्रामीण भागातली एक तरुण मुलगी जेव्हा आपल्या प्रेमासाठी, स्वतंत्र विचारांसाठी लढते हे प्रेक्षकांना मनापासून भिडले.
‘सैराट’च्या यशानंतर रिंकूने काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहून शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला. मात्र तिची अभिनयाची ओढ कायम राहिली. त्यानंतर तिने ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. हा चित्रपट प्रेमकथेऐवजी राजकारणाशी संबंधित विषयावर आधारित होता. यात तिने एका राजकीय इच्छाशक्ती असलेल्या तरुणीची भूमिका केली होती, आणि या भूमिकेमध्येही तिने आपला ठसा उमटवला. मराठीबरोबरच रिंकूने हिंदी वेब सिरीजमध्येही आपली छाप सोडली आहे. नेटफ्लिक्सवरील ‘हंड्रेड’ या वेब सिरीजमध्ये तिने लारा दत्ता हिच्या समवेत काम केलं. यात तिने एक पोलिस कर्मचारी बनण्याची इच्छा असलेल्या मुलीची भूमिका निभावली होती. हिंदीतही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : सिनेमाच्या शूटिंगवेळी शाहरुख खान जखमी, तातडीने अमेरिकेला हलवलं, काय घडलं?